व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) म्हसवड येथील श्रीमंत भैय्यासाहेब राजमाने महाविद्यालय म्हसवड येथील 2004 कला शाखेचा दुसरा स्नेहसंमेळावा मोठ्या उत्साहाने साजरा झाला. २० वर्षानंतर पुन्हा वर्गमित्र एकत्रित आले.
आण्णासाहेब कोळी, भगवान लोखंडे , आसिम तांबोळी, मेघनाथ शिंगाडे, संजय गलंडे, सुनील थोरात, राजश्री सावंत, लता हत्तीकर आणि साधना मदने या सर्वांच्या उपस्थित खेळीमेळीच्या वातावरणात स्नेह मेळावा संपन्न झाला. यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांचे स्वागत करण्यात आले. विशेषता एसएससी एचएससी आणि कॉलरशिप मध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कु. अलविया असीम तांबोळी (एन एम एम एस स्कॉलरशिप आणि इयत्ता आठवी कॉलरशिप प्रथम श्रेणी) कु. वैष्णवी अण्णासाहेब कोळी (एस.एस.सी. सेमी इंग्लिश ) कु. तैबा रफिकमहंमद आतार (एच एस सी), शुभम संजय गलंडे (ए बी ए सी यु एस नॅशनल कॉम्पिटिशन 2023 -2024) आणि सोहम सुरेश सूर्यवंशी (एच एस सी) यांना शालेय भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. स्नेह मेळावा यशस्वी पार पाडण्यासाठी भगवान लोखंडे, असिम तांबोळी आणि मेघनाथ शिंगाडे यांनी परिश्रम घेतले.