श्रीक्षेत्र गोंदवले बुद्रुक कडकडीत बंद

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
विजयकुमार ढालपे
गोंदवले
                जालना घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत असताना श्रीक्षेत्र गोंदवले बुद्रुक ता.माण येथे ही या घटनेचा निषेध म्हणून पुकारण्यात आलेल्या बंदला गोंदवलेकरांनी उत्स्फूर्तपणे पाठींबा दर्शवत कडकडीत बंद पाळला. 
    राज्यभरातील मराठा समाज एकवटल्याने या समाजाकडुन राज्यभर ठिकठिकाणी मोर्चे निघत असताना दि.३ रोजी सातारा जिल्हा बंदची हाक दिली या हाकेचा माण तालुक्याने देखील सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे पहावयास मिळाले माण तालुक्यातील प्रसिद्ध असलेले श्रीक्षेत्र गोंदवले बुद्रुक या गावाची ओळख आहे या गावातील मराठा समाज बाधंवानी दि.४ रोजी बंदची हाक दिली होती त्या हाकेस गोंदवलेकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आज सोमवारी गोंदवलेत कडकडीत बंद पाळण्यात आला.
      या बंद मध्ये गावातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहिल्याने गावातील रस्ते ओस पडल्याचे दिसुन आले तर गोंदवलेकरांनी बंद मध्ये जालना घटनेचा निषेध केला दरम्यान दहिवडी पोलीस स्टेशनचे सपोनि अक्षय सोनवणे यांनी गोंदवले गावातील पाहणी करून पोलीस पाटील सौ.आशा भोसले यांना योग्य त्या सुचना दिल्या
       यावेळी दहिवडी पोलीस स्टेशनचे गोपनीय पोलीस इंदलकर,गोंदवले बिटचे पोलीस श्री.विरकर व गोंदवले गावचे सरपंच श्री. जयप्रकाश कट्टे,गुलाबराव कट्टे,हणमंत फडतरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते
  छाया – गोंदवले भेटीच्या वेळी सपोनि अक्षय सोनवणे  व मान्यवर.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!