अती दुर्मिळ ‘स्पाईन टेल डेव्हिल रे’मासा विक्री प्रकरणी कोल्हापूर येथे वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला

कुलदीप मोहिते 

कोल्हापूर, दि. २५ फेब्रुवारी २०२६ :
अति दुर्मिळ व संरक्षित प्रवर्गातील स्पाईन टेल डेव्हिल रे (शास्त्रीय नाव – ) हा मासा विक्रीसाठी आणल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर वन विभागाने कोल्हापूर येथे धाड टाकून संबंधित मासा जप्त केला. या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वनपरिक्षेत्र करवीर यांच्या पथकाने फुलेवाडी रिंग रोड येथील फ्रेंडशिप फिश कंपनी येथे छापा टाकला असता, मृत अवस्थेतील (पाकट) शॉर्टफिन डेव्हिल रे (शास्त्रीय नाव – ) हा अनुसूची-I मधील संरक्षित वन्यजीव विक्रीसाठी ठेवलेला आढळून आला. संबंधित मासा ताब्यात घेऊन जप्त करण्यात आला.

या प्रकरणी वनरक्षक करवीर यांनी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये    सुनिल विनोद सातपुते (रा. येडेमच्छींद्र, ता. वाळवा, जि. सांगली) याचेविरुद्ध   WL ०४/२०२६ दिनांक २५/०२/२०२६ असा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या कारवाईत उपवनसंरक्षक कोल्हापूर श्री. धैर्यशिल पाटील व सहाय्यक वनसंरक्षक (वनी/कॅम्पा) श्री. विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल करवीर श्री. नंदकुमार नलवडे, वनपाल श्री. सागर कोळी, वनरक्षक श्री. ओंकार भोसले, श्री. विकास घोलप, श्री. महादेव कुंभार, श्री. विदेश तांबारे, कंत्राटी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर तसेच मानद वन्यजीव रक्षक श्री. रमण कुलकर्णी यांनी सहभाग घेतला.

वन विभागाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, संरक्षित वन्यजीवांची खरेदी-विक्री करणे हा गंभीर गुन्हा असून अशा प्रकारची माहिती तात्काळ वन विभागास कळवावी.

— (नं. ज. नलवडे)
वनक्षेत्रपाल, करवीर


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *