शेतकऱ्यांच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा पुढाकार; महसूल मंत्र्यांकडून तातडीच्या कार्यवाही चे आदेश

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड :प्रतिनिधी
तांत्रिक अडचणींच्या गुंत्यात अडकलेल्या माण तालुक्यातील शेतकऱ्यांचे दु:ख जाणून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी थेट मुंबई गाठत त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवला. शासन दरबारी निवेदन देऊन तातडीच्या निर्णयांसाठी त्यांनी पुढाकार घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे.

माण तालुक्यातील शेतकरी सध्या फार्मर आयडीशी संबंधित तांत्रिक अडचणींमुळे शासकीय योजनांपासून वंचित राहत आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या दोन किंवा अधिक गावांमध्ये असलेल्या जमिनींची नोंद फार्मर आयडीवर होत नसल्यामुळे त्यांना पीक नुकसान भरपाईसह विविध लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी या गंभीर विषयाची दखल घेत मुंबईत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.

या बैठकीस आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे देखील उपस्थित होते. खासदार मोहिते पाटील यांनी शेतकऱ्यांची अडचण स्पष्ट करताना सांगितले की, फार्मर आयडीमध्ये जमिनीची अपुरी माहिती ही त्यांच्या शासकीय मदतीपासून वंचित राहण्यामागे प्रमुख कारण आहे.

शेतकऱ्यांच्या हिताचे गांभीर्य ओळखून महसूल मंत्री बावनकुळे यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.

या पुढाकारामुळे माण तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 

 

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *