कराड तहसील कार्यालयात मंगळवारी सैनिक दरबार

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज – संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते
कराड (ता. १३) : प्रतिनिधी
माजी सैनिक व शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या विविध समस्या तसेच शासनाच्या कल्याणकारी योजनांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सैनिक दरबार मंगळवार दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

या सैनिक दरबाराचे अध्यक्षस्थान कराड तालुका प्रांत अधिकारी अतुल म्हेत्रे व तहसीलदार कल्पना ढवळे हे भूषवणार आहेत. या बैठकीचे आयोजन अमृत वीर जवान अभियान समिती व सैनिक कक्ष, कराड तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

दरम्यान, या सैनिक दरबारात आजी व माजी सैनिक, शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या विविध शासकीय प्रशासकीय समस्या सोडविण्यासाठी तसेच त्यांना विविध कल्याणकारी योजना, सवलती व हक्कांचे लाभ याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.

या बैठकीस पोलीस विभाग, ग्रामविकास, भूमी अभिलेख, कृषी, वन विभाग, नगर परिषद, बांधकाम, निबंधक, महावितरण यांसह सर्व संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

सर्व आजी/माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय तसेच शहीद जवानांच्या परिवारांनी या सैनिक दरबारात मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या अडचणी मांडाव्यात व या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशांत कदम (माजी सैनिक, राज्य उपाध्यक्ष सैनिक फेडरेशन, माजी सैनिक संघटना प्रतिनिधी व सदस्य संरक्षण समिती) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

दिनांक: मंगळवार, १४ ऑक्टोबर २०२५
स्थळ: तहसील कार्यालय सभागृह, कराड
अध्यक्ष: प्रांत अधिकारी अतुल म्हेत्रे व तहसीलदार कल्पना ढवळे

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *