“सैनिक हो तुमच्यासाठी”महसूल दिवस कराड तहसील कार्यालयात साजरा

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

कुलदीप मोहिते

कराड:प्रतिनिधी

     शनिवार दिनांक 10 8 2024 रोजी सातारा जिल्ह्यातील कराड तालुका येथील तहसील कार्यालयात सैनिक हो तुमच्यासाठी महसूल दिवस साजरा करण्यात आला

कराड तालुक्याचे तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व आजी/ माजी सैनिक, शहीद जवान कुटुंबियांच्या तक्रारीचे निराकरण याप्रसंगी करण्यात आले व शहीद जवान कुटुंबीय यांचा प्रशासनाच्या वतीने सन्मान यावेळी करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती नायब तहसीलदार बाबुराव राठोड, आरोग्य विभागाचे अधिकारी डॉक्टर संजय कुंभार,पंचायत समितीचे विस्तार अधिकारी . मारुती संकपाळ, जिल्हा सैनिक कल्याण विभागाचे प्रतिनिधी H/LT (नि.) राजाराम सावंत उपस्थीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महारष्ट्र शासन अमृत वीर जवान सन्मान अभियान सैनिक संघटना प्रतिनिधी व सैनिक फेडरेशन जिल्हा अध्यक्ष प्रशांत कदम (माजी सैनिक) यांनी केले व आभार (नि.) सुभेदार राजाराम माळी यांनी मानले.

या प्रसंगी विविध प्रशासकीय विभागाचे प्रतिनिधी, कराड तहसील कार्यालयातील .युवराज काटे (दादा) व राजेंद्र चव्हाण साहेब, सैनिक फेडरेशन कराड तालुका अध्यक्ष सदाशिव नागने व सर्व माजी सैनिक संघटना अध्यक्ष,उपाध्यक्ष व कराड तालुक्यातील माजी सैनिक त्यांचे कुटुंबीय शहीद जवान कुटुंबीय बहुसंख्येने उपस्थित


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!