राष्ट्रीय कराटे स्पर्धेत म्हसळ्याचा सोहेल तांबे सुवर्णपदकाचा मानकरी,विक्रांत खांडेकरने पटकावले रौप्यपदक

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला

म्हसळा – सुशील यादव

स्कूल गेम्स ऑफ इंडिया यांच्या मार्फत आयोजित ६९ व्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेचे आयोजन नुकतेच बारामती येथे करण्यात आले होते.

या स्पर्धेत महाराष्ट्रासह गुजरात, गोवा,पंजाब,आंध्रप्रदेश,राजस्थान, बिहार,तामिळनाडू, केरळ, ओडिसा,दिल्ली आदी राज्यांतील नामांकित कराटेपटूंनी सहभाग नोंदवला होता.या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत चॅम्पियन कराटे क्लब,म्हसळा येथील खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले.सोहेल शशिकांत तांबे, आयडियल इंग्लिश स्कूल,म्हसळा येथील विद्यार्थी याने ६६ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावून म्हसळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.विशेष बाब म्हणजे,राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा सोहेल तांबे हा म्हसळा तालुक्यातील पहिला खेळाडू ठरला आहे.
त्याचप्रमाणे विक्रांत विश्वास खांडेकर,न्यू इंग्लिश स्कूल, म्हसळाचा विद्यार्थ्याने ५० किलो वजनी गटात रौप्यपदक (सिल्वर मेडल)मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली आहे.दोन्ही खेळाडूंनी आपल्या शाळा,पालक,गुरुजन तसेच म्हसळा गावाचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे.
या दैदीप्यमान यशामागे शिहान संतोष मोहिते,प्रशिक्षक सेन्सई अविनाश मोरे,महाराष्ट्र अध्यक्ष सलाउद्दीन अन्सारी,जनरल सेक्रेटरी संदीप गाडे तसेच अभय कळमकर यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले असल्याचे सांगण्यात आले.या ऐतिहासिक यशाबद्दल सोहेल तांबे व विक्रांत खांडेकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *