आम आदमी पक्षाच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी सोहम शिर्के यांची निवड

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला 

म्हसवड प्रतिनिधी :

            भाटकी (ता. माण) येथील सुपुत्र व सामाजिक कार्यकर्ते सोहम शिर्के यांची आम आदमी पक्षाच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. तसेच माण–खटाव विधानसभा मतदारसंघाची जबाबदारीही पक्षाकडून त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

नियुक्तीनंतर बोलताना सोहम शिर्के म्हणाले की, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्या विचारधारेने प्रेरित होऊन सातारा जिल्ह्यात संघटन अधिक बळकट करण्यासाठी व्यापक स्तरावर काम केले जाईल. गावागावात पक्षाची मजबूत बांधणी करून सामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्याचा आमचा संकल्प आहे. आम आदमी पक्षाच्या पारदर्शक व जनहितवादी धोरणानुसार आगामी काळात निवडणुका ताकदीने लढविण्यात येतील.

      ते पुढे म्हणाले, “आगामी माण–खटाव विधानसभा निवडणूक आम्ही जोरदार ताकदीने लढणार आहोत. सर्व समाजघटकांतील तरुणांना व सामान्य नागरिकांना पक्षात काम करण्याची संधी देऊन नव्या नेतृत्वाला व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहोत. आत्तापर्यंत जनतेच्या प्रश्नांसाठी अनेक वेळा आंदोलन, उपोषण व विविध लोकशाही मार्गांचा अवलंब केला असून पुढील काळातही जनतेच्या हक्कासाठी लढा कायम राहील.”

    सोहम शिर्के यांच्या निवडीमुळे माण–खटाव मतदारसंघात आम आदमी पक्षाची संघटनात्मक ताकद वाढणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *