दहिवडीत मोदींविरोधात घोषणाबाजी ; युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड*

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
 म्हसवड प्रतिनिधी.
        माण, खटाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी दहिवडीतील फलटण चौकात युवक काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समविचारी पक्षांनी रास्ता रोको केला. यावेळी ‘भाजप सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय’, ‘युवक काँग्रेस जिंदाबाद, नरेंद्र मोदी मुर्दाबाद’, ‘शेतकर्‍यांना न्याय मिळालाच पाहिजे’ अशी घोषणाबाजी करणाऱ्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी प्रशासनाचाही निषेध नोंदवला.
सत्तेच्या व खुर्चीच्या हव्यासाने दंग झालेले महाराष्ट्रातील भावनाशून्य व बेकायदेशीर सरकार लोकांच्या सहनशीलतेची वाट लावण्यासाठीच सत्तेवर बसले आहे का, असा प्रश्न करत या सरकारला जागे करण्यासाठी आज युवक काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समविचारी पक्ष आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत दहिवडीतील फलटण चौकात रस्ता रोको आंदोलन झाले.
यावेळी माण व खटाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा. जनावरांसाठी चारा पाण्याची सोय करावी. उरमोडीचे व तारळीचे पाणी मोफत सोडावे. टंचाईग्रस्त गावांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी ट्रँकर चालू करावेत, यासाठी फिडिंग पॉईंट तयार करावेत. पिंगळी व येरळवाडीसह सर्व पाझर तलाव व छोटे मोठे तलाव भरावेत.
खरीप हंगाम वाया गेल्याने त्याची नुकसान भरपाई मिळावी. पिक कर्ज माफ करावे. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान त्वरीत मिळावे. कांद्यावरील ४० टक्के निर्यात शुल्क रद्द करावे अशा मागण्या करण्यात आल्या.
यावेळी ‘युवक काँग्रेस जिंदाबाद’ , ‘शेतकर्‍यांना न्याय मिळालाच पाहिजे’ अशी घोषणाबाजी करणाऱ्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी प्रशासनाचाही निषेध नोंदवला.
या आंदोलनात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे सदस्य रणजितसिंह देशमुख, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी उदयभानू चिंब, सहप्रभारी एहसान खान, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेस सचिव निलेश काटे, उमेश ताटे, युवकचे जिल्हाध्यक्ष अमरजित कांबळे, एम. के. भोसले,युवकचे जिल्हा उपाध्यक्ष सागर सावंत,महेश गुरव, अॅड.संदीप सजगणे, बाबासाहेब माने, डॅा.संतोष गोडसे, विजयराव शिंदे, योगेश भोसले, विधानसभा उपाध्यक्ष पंकज पोळ नकुसा जाधव दाऊद मुल्ला मान्यवर उपस्थित होते.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!