रोटरी क्लब ऑफ पुणे कॅन्टोन्मेंट आणि स्लिपींग चिल्ड्रन अराऊंड द वर्ल्ड (SCAW, कॅनडा) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ४ फेब्रुवारी २०२५ ते १४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत जिल्ह्यातील विविध भागांतील ५००८ गरजू विद्यार्थ्यांना सुमारे ३ कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे स्लीपींग व स्कूल किट वाटप करण्यात आले असल्याचे वैभव पोरे (कार्यक्रमाचे समन्वयक रोटरी & स्कॉ -कॅनडा )यांनी सांगितले
हा उपक्रम दौंड (यवत), आंबेगाव (गोहे बु॥), जुन्नर (खोडद), इंदापूर (भिगवण), खेड (कान्हेवाडी), वाई (धोम), भोर (आळंदे) या तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या इयत्ता १ ते ४ मधील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आला. प्रति विद्यार्थ्याला सुमारे ६ हजार रुपयांचे किट देण्यात आले.
किटमध्ये ४६ वस्तूंचा समावेश विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये आणि त्यांना आवश्यक साहित्य पुरवले जावे यासाठी या किटमध्ये चटई, सतरंजी, बेडशीट, उशी, सोलापुरी चादर, पोलर ब्लँकेट, मच्छरदाणी, शूज-सॉक्स, स्वेटर (हुडी), स्पोर्ट्स ड्रेस, नाईट ड्रेस, थर्मल वॉटर बॉटल, रेनकोट, स्कूल बॅग, योगा मॅट, स्टेशनरी साहित्य यांसह एकूण ४६ वस्तू विद्यार्थ्यांना देण्यात आल्या.
नेत्रतपासणी व मोफत शस्त्रक्रिया सुविधा याच उपक्रमांतर्गत एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, महंमदवाडी, हडपसर यांच्या वतीने सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी देखील करण्यात आली. गरजू विद्यार्थ्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार असून शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या विद्यार्थ्यांची पुण्यात मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती या उपक्रमासाठी कॅनडाच्या SCAW टीममधील Helen Scutt (टीम लीडर), Jeff McDougall (असिस्टंट टीम लीडर), Kathy Ware आणि Eileen St Croix यांची विशेष उपस्थिती होती.
तसेच रोटरी क्लब ऑफ पुणे कॅन्टोन्मेंट चे अध्यक्ष श्री. तौहिद कॉन्ट्रॅक्टर, तसेच श्री. पंकज आपटे, श्री. समीर रुपानी, श्री. परवेझ बिलीमोरीया आणि रोटरी क्लब ऑफ पुणा नॉर्थ, रोटरी क्लब ऑफ निगडी, रोटरी क्लब ऑफ गांधीभवन, रोटरी क्लब ऑफ पुणा, रोटरी क्लब ऑफ भिगवण चे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना दिलासा गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य मिळाल्यामुळे आणि नेत्रतपासणी झाल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. या उपक्रमामुळे शाळेतील उपस्थिती वाढण्यास मदत होईल तसेच शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यास हातभार लागेल, असा विश्वास मुख्य कार्यक्रम समन्वयक वैभव पोरे यांनी व्यक्त केला.