शिष्यवृत्ती परीक्षेत बहीण भाऊ यांचे उत्तुंग यश.
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
विजयकुमार ढालपे
गोंदवले प्रतिनिधी :
माण तालुक्यातील क्रांतीवीर इंग्लीश मेडीयम स्कूल म्हसवड येथील सुहास ज्ञानदेव नरळे याने आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत ३०० पैकी २६६ गुण प्राप्त करून राज्याच्या यादीत २२ वे स्थान पटकविले आहे तसेच सुहासची बहीण कु.सुहानी ज्ञानदेव नरळे जिल्हा परिषद प्राथ.शाळा नं.3 हिने पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत 300 पैकी २६६ गुण प्राप्त करून जिल्हयाच्या यादीत २१ वे स्थान पटकविले आहे तिला वर्गशिक्षिका सौ.मनिषा शेटे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले तर सुहास याला श्री.भाऊ शिंदे व वडील ज्ञानदेव नरळे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
सुहास व सुहानी यांच्या यशाबद्दल क्रांतीवीर संस्थेच्या सचिव सौ.सुलोचना बाबर मॅडम,प्राचार्य फुटाणे सर माण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री.लक्ष्मण पिसे साहेब,शिक्षणविस्तार अधिकारी श्री.रमेश गंबरे,सौ.सोनाली विभुते मॅडम,केद्रप्रमुख श्री.बाळासाहेब पवार आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.
छाया – सुहास नरळे,सुहानी नरळे.