शिंगणापूर मार्डी रस्त्याच्या साईड पट्ट्या खचल्या! सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष! : संदिप पोळ
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
विठ्ठल काटकर
कुकुडवाड/प्रतिनिधी
महाराष्ट्राचे कुलदैवत शिखर शिंगणापूर रस्त्याची दुर्दशा झाली असून अनेक अपघातात प्रवाशांचा जीव जात आहेत, मात्र सार्वजनिक बांधकाम खाते जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप डॉक्टर संदिप पोळ यांनी केला आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा पोळ यांनी दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की शिखर शिंगणापूर रस्ता गेले अनेक दिवस चर्चेत असून या रस्त्यावर अनेक ठिकाणी गुडघाबर खड्डे पडले असून,या रस्तावरून वाहने चालविणे कठीण झाले आहे. दरम्यान मार्डी ते शिंगणापूर(शिपदरा)या ठिकाणी रस्त्याची साईड पट्टी पूर्णपणे खचली असून आतापर्यंत अनेक आवजड वाहणांची पलटी झाली आहे व अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
अधिकाऱ्यांना अनेक वेळा फोन करून कल्पना दिली मात्र सार्वजनिक बांधकाम जाणीवपूर्वक या प्रश्नाकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप डॉक्टर संदिप पोळ यांनी केला आहे.त्याच बरोबर म्हसवड शिंगणापूर व दहिवडी मार्डी या रस्त्याच्या साईड पट्ट्या येत्या आठ दिवसात भरून दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा डॉक्टर संदिप पोळ यांनी दिला आहे.