महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागातर्फे आयोजित केलेल्या एस.एस.सी बोर्ड परीक्षा मार्च 2024 ची परीक्षा शुक्रवार दि. 1 मार्च 2024 ते दि.26 मार्च या कालावधीत परीक्षा संपन्न होणार आहे.
सिध्दनाथ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, म्हसवड केंद्र क्र. 1404 या केंद्रावरती सुरु होत असलेल्या एस एस सी परीक्षे साठी सिद्धनाथ हायस्कुल व ज्यू कॉलेज म्हसवड,मेरी माता हायस्कुल म्हसवड,ज्ञानवर्धिनी हायस्कुल म्हसवड ; सरस्वती विद्यालय म्हसवड ,क्रांतिवीर विद्यालय म्हसवड, कारखेल विद्यालय, धुळदेव विद्यालय, खडकी विद्यालय , पुळकोटी विद्यालय या ठिकाणचे एकुण 511 विद्यार्थी परीक्षा देणार असून त्यांची बैठक व्यवस्था ज्ञानवर्धिनी हायस्कुल म्हसवड येथील 9 वर्गखोल्या व सिध्दनाथ हायस्कुल व ज्यू कॉलेज म्हसवड या प्रशालेतील 13 वर्ग खोल्या अशा एकूण २१ वर्ग खोल्या मध्ये या सर्व विध्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे
परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी २५ पर्यवेक्षक तसेच केंद्रसंचालक म्हणून श्री दिलीप माने, उपकेंद्र संचालक म्हणून श्री संतोष देशमुख व श्री काळे याची तर केंद्रात स्टेशनरी विभागात प्रवीण भोते व गोषण वळवी यांची नेमणूक करण्यात आली आहे विद्यार्थ्यानी केंद्रावर बोर्डाने प्रकाशित केलेल्या अधिकृत वेळापत्रकाप्रमाणे प्रवेश पत्र (रिसीट), ओळख पत्र व लेखन साहित्य घेऊन शालेय गणवेशात परीक्षेच्या वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर उपस्थित रहावे.
उशिरा येणा-या विद्यार्थ्यास परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. विद्यार्थ्याने परीक्षा केंद्राच्या आवारात भ्रमनध्वनी (मोबाईल), टॅबलेट, इलेक्ट्रॉनिक घडयाळ, पॉकेट कॅलक्युलेटर वा तत्सम इलेक्ट्रॉनिक साधने किंवा उपकरणे परीक्षा केंद्रावर बाळगण्यास सक्त मनाई आहे. विद्यार्थ्याने कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब न करता कॉपीमुक्त वातावरणात निर्भयपणे परीक्षा दयावी. तसेच परीक्षा व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी सहकार्य करावे असे आवाहन प्राचार्य श्री. प्रवीण दासरे व केंद्रप्रमुख श्री दिलीप माने यांनी केले आहे.