शुभम भारत गॅस एजन्सीच्या संचालिका सौ सुवर्णा सुनील पोरे यांनी आयोजित केलेला हळदी-कुंकू कार्यक्रम मकर संक्रांत उत्साहात : कोरोनामुळे दोन वर्षांनंतर महिला मोठ्या प्रमाणात सहभागी

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज
BY ;Ahmad Mulla 
म्हसवड ;
             नवीन वर्षातील येणारा आनंदाचा आणि स्नेहाचा पहिलाच सण मकर संक्रांतीनिमित्त म्हसवड येथे शुभम भारत गॅस एजन्सी च्या भव्य पटांगणात संचालिका सौ सुवर्णा सुनील पोरे यांनी मकरसंक्राती निमित्त  महिलांसाठी भव्य    हळदी कुंकु समारंभाचे आयोजन  केले होते
                                 या   हळदी कुंकु समारंभास म्हसवड शहरातील  हजारो महिलांनी सहभाग घेऊन   मकर संक्रांतीनिमित्त एकामेकींना हळदी-कुंकवाचा मान देऊन तीळगूळ देऊन मकर संक्रांतीचा सण साजरा केला. सकाळी नऊ वाजलेपासुन रात्री दहा वाजेपर्यंत महिलांची ये जा सुरु होती
 यावेळी सौ सुवर्णा पोरे व त्यांच्या दोन सुना  यांनी या हळदी कुंकु कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रत्येक उपस्थित महिलांचे स्वागत करुन त्याना  वाण म्हणून  पान सुपारी दुध अल्पोपहा व आकर्षक भेटवस्तू देण्यात आली
                 पोरे कुटुंब नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतातच इंजि सुनील पोरे यांनी नुकतेच  भव्य असे  रक्तदान शिबीराचे आयोजन देखील केले होते़ या शिबीरात सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहभाग घेतला होता व उच्चांकी १६१ इतके रक्तदान झाले होते
सौ सुवर्णा पोरे  व इंजि सुनील पोरे यांचे आपल्या विविध सामाजिक कार्यामुळे व गॅस एजन्सीमुळे म्हसवड शहर व परिसरातील प्रत्येक घरांशी आपुलकीचे संबध असल्या मुळे या हळदी कुंकु समारंभास मोठ्या प्रमाणात सर्व जाती धर्माच्या   महिलांनी उपस्थिती लावली होती

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!