वाई येथील शॄंगार नुतन कपड्यांचे दालन अल्प कालावधीत गरुड झेप घेईल… इंजि सुनील पोरे
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
वाई : प्रतिनिधी
वाई येथे शॄंगार नावाने ग्राहकांचे सेवेसाठी नुतन कपड्यांचे दालन अल्प कालावधीत गरुड झेप घेईल असा विश्वास. इंजि सुनील पोरे यांनी व्यक्त केला वाई येथील नामवंत शालेय औद्योगिक व रुग्णालय युनिफॉर्म स्पेशालिस्ट निलेश भास्करराव चौगुले या युवकाने आपल्या पारंपरिक युनिफॉर्म शिलाईचे व्यवसायात स्वबळावर वाढ करीत वडिलोपार्जित वास्तुत आधुनिकतेची झालर लावत शॄंगार ड्रेसेस या नावाने तयार कपड्यांचे शोरुमचा शुभारंभ गुरुवार दि ८ जून रोजी सातारा जिल्हा नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष इंजिनिअर सुनील पोरे यांचे हस्ते संपन्न झाला यावेळी बोलताना पोरे यांनी तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतः उद्योग उभारुण नोकरी दाते व्हावे व तरुणांना रोजगार संधी उपलब्ध करून द्यावी नासपचे माध्यमातून जरुर ते सहकार्य केले जाईल आज दहा हातांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे अल्प कालावधीत ही संस्था शंभर हातांना रोजगार उपलब्ध करून देईल अशाप्रकारच्या शुभेच्छा देऊन निलेश चौगुले याचे अभिनंदन केले कार्यक्रमास डॉ मकरंद पोरे, विजयशेठ चांडवले,प्रितम भुतकर, भानुदास बाचल,अतुल वाईकर, चंद्रशेखर वनारसे,हेमंत चौगुले,भगवंत कल्याणकर,प्रकाश मांडरे,प्रकाश खांडके अमोल चौगुले आदी वाई पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक, समाज बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत वाई शिंपी समाज अध्यक्ष भास्करराव चौगुले यांनी केले