श्री शंकर सहकारी पहिला हप्ता २५०० रु देणार. – . रणजितसिंह मोहिते पाटील.
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
*श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर* सन *२०२३-२४* चा *५०* वा *गळीत हंगाम* व *काटा पूजन व बैल गाडी पुजन* कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती *मदनसिंह मोहिते पाटील* व आमदार राम सातपुते यांच्या शुभहस्ते करण्यात आले. *गव्हाण* व *मोळी पूजन* महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री *मा. श्री. विजयसिंह मोहिते पाटील* यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी *कै. काकासाहेब* व *अक्कासाहेब* आणि *स्व. सहकार राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील* यांच्या *प्रतिमेचे पूजन जेष्ठ सभासद नामदेव लक्ष्मण सावंत* व *दस्तगीर हुसैन मुलाणी* यांनी केले.
याप्रसंगी बोलताना *विधानपरिषद आमदार तथा श्री शंकर सहकारी कारखान्याचे चेअरमन मा. श्री. रणजितसिंह मोहिते पाटील* यांनी *श्री शंकर सहकारी कारखाना पहिला हप्ता इतर कारखान्याच्या FRP प्रमाणे शेतकऱ्यांच्या उसाला दर देणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी कारखान्यास भरपूर प्रमाणात ऊस गाळपास द्यावा असेही यावेळी सांगितले. तसेच या हंगामात कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून 4.50 लाख में.टन गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.*
यावेळी *सत्यनारायण पूजन सुरेश मोहिते* यांनी सप्तनिक केले. *ऊस वाहतूक बैलगाडी मुकादम प्रकाश चिलूभाऊ वळकुंडे, शेतकरी सभासद सुभाष शंकर शेंडे व अलका शिंडे * यांना पहिला हप्ता *२५०० रु* प्रमाणे रोख देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
*यावेळी प्रमुख पाहुणे शिवामृत दूध संघांचे चेअरमन मा. श्री. धैर्यशील मोहिते पाटील* *सहकार महर्षीचे व्हा. चेअरमन शंकरराव माने – देशमुख, मार्केट कमिटीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, माजी व्हा. चेअरमन प्रकाश आप्पा पाटील, जेष्ठ नेते गणपतराव वाघमोडे, व्हा चेअरमन मिलिंद कुलकर्णी, मल्लसम्राट रावसाहेब आप्पा मगर, भाजपा माजी तालुका अध्यक्ष बाजीराव काटकर, शिवामृत दूध संघांचे व्हा. चेअरमन दत्तात्रय भिलारे, माळशिरस नगरपंचायत चे नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, नातेपुतेच्या नगराध्यक्षा अनिता लांडगे, महाळुंगचे उपनगराध्यक्ष भिमराव रेडे – पाटील, सत्यप्रभादेवी रणजितसिह मोहिते पाटील, माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील, मा. उपसभापती अर्जुनसिह मोहिते पाटील, भानवसे आबा, मानशिंग मोहिते,नामदेव ठवरे, कारखाना डिझाईनर गरड साहेब,बाबासाहेब कर्णवर, मार्केट कमिटी संचालक, लक्ष्मण पवार, अप्पासाहेब रूपनवर, सुधीर सुरवसे, BY राऊत वकील साहेब, केशव कदम, लिंगा पाटील, शिवामृत संचालक सचिन रननवरे, हरिभाऊ मगर,शरद आबा साळुंखे,भास्कर तुपे, नितीन मामा खराडे, मा. जि.प सदस्य अरुण तोडकर, बबन गायकवाड, तानाजी पालवे,मोहन लोंढे,माऊली सूळ, विजय देशमुख, संजय काका मोटे, सहकार महर्षीचे संचालक लक्ष्मण शिंदे, हनुमंत शिंदे , सदाशिवनगर सरपंच विरकुमार दोशी, पुरंदावडे सरपंच राणी मोहिते, उपसरपंच देविदास ढोपे*कारखान्याचे संचालक, कारखान्याचे एक्झिकुटीव्ह डायरेक्टर श्री. स्वरूप देशमुख, कार्यकारी संचालक अभिजित डुबल, जनरल मॅनेजर रविराज जगताप, विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, विविध संस्थाचे पदाधिकारी, शेतकरी सभासद , अधिकारी,कामगार,व्यापारी, ग्रामस्थ* आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.