पंढरपुरात श्री संत शिरोमणी नामदेव महाराज स्मारकासाठी ऐतिहासिक पाऊल अधिकृत स्थळ पाहणी यशस्वी | समाजात उत्साहाचे वातावरण

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला

अदनान कल्यानी 
पंढरपूर | प्रतिनिधी
संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या भव्य स्मारक उभारणीच्या दिशेने पंढरपुरात एक ऐतिहासिक पाऊल टाकण्यात आले. शासनाने मंजूर केलेल्या जागेची गुरुवार, दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी अधिकृत स्थळ पाहणी यशस्वीरीत्या पार पडली असून, या क्षणामुळे संपूर्ण नामदेव समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पाहणीपूर्वी श्री केशवराज संस्था, नामदेव मंदिर, पंढरपूर येथे सकाळी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस नामदेव महाराजांचे वंशज, समाजबांधव, विविध संघटनांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. बैठकीनंतर भक्ती सागर परिसरात, चंद्रभागा नदीच्या पलीकडे असलेल्या सुमारे ६५ एकर क्षेत्रालगत स्मारकासाठी प्रस्तावित जागेची अधिकृत पाहणी करण्यात आली.

या स्थळ पाहणीस उपविभागीय अधिकारी पंढरपूर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तसेच प्रकल्प सल्लागार उपस्थित होते. पाहणीनंतर स्मारकाच्या आराखडा व नियोजन प्रक्रियेला वेग मिळणार असून, ही प्रक्रिया समाजाच्या श्रद्धेचे व एकजुटीचे प्रतीक ठरत असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

      महाराष्ट्रभरातून नामदेव महाराजांचे वंशज, नामदेव समाजोन्नती परिषद, श्री संत नामदेव क्षत्रिय एकसंघ, श्री केशवराज संस्था पंढरपूर व श्री संत नामदेव शिंपी समाज पंढरपूर यांच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने समाजबांधव या ऐतिहासिक प्रसंगी उपस्थित होते.

      स्थळ पाहणीनंतर सर्व उपस्थितांसाठी नामदेव मंदिर येथे भोजन व्यवस्था करण्यात आली. श्री संत शिरोमणी नामदेव महाराज स्मारक उभारणीस सुरुवात झाल्याने ही प्रक्रिया भविष्यात समाजाच्या सांस्कृतिक वैभवाचा महत्त्वपूर्ण अध्याय ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *