कापील येथे श्री संत रोहिदास महाराज जयंती मोठया उत्साहात साजरी

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते कराड

कराड श्री संत रोहिदास महाराज जयंती निमित्त देवदास बामणे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात मोठया उत्सहात करण्यात आली.
या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना देवदास बामणे पुढे म्हणाले, भारतीय इतिहास आणि साहित्यात श्री.संत रोहिदास महाराजांचे महत्त्वाचे स्थान आहे. त्यांनी शोषित- पीडित वंचित -दलित जनतेच्या आकांक्षांना आपल्या रचनांमधून अभिव्यक्त केले. सामाजिक न्याय सामाजिक समता आणि सर्वधर्मसमभाव त्यांच्या वाणीचा मूळ स्वर होता. त्यामुळे आजच्या काळातल्या युवा पिढीला श्री संत रोहिदास महाराजांचे कार्य समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्यांचा सकारात्मक विचारांचा वारसा आजच्या युवा पिढीने मोठ्या श्रद्धेने आणि तळमळीने पुढे चालवायला हवा, असे ते बोलत होते.
या कार्यक्रमाला गावचे पोलीस पाटील तुषार ढापरे, ज्येष्ठ नागरिक मोहन जाधव, सामाजिक युवा कार्यकर्ते शिवराज जाधव, सेवा सोसायटीचे माजी चेअरमन प्रल्हाद देशमुख, पोपट सावंत, दत्त गणेश मंडळाचे अध्यक्ष गणेश वायचळ, चर्मकार मंडळाचे अध्यक्ष मधुकर बामणे, उपाध्यक्ष सचिन बामणे, मार्गदर्शक महादेव बामणे,बीके सदस्य देवदास बामणे, हरी बामणे, त्याचबरोबर समाजातील मान्यवर तरुण-तरुणी महिला पुरुष आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!