श्री सम्मेद शिखरजी सिध्दक्षेत्र , जैन धर्मीय काशी येथे केंद्र सरकारने पर्यटन क्षेत्र जाहिर केलेबाबत  जैन बांधवांचा निषेध मोर्चा

बातमी Share करा:

म्हसवड :  केंद्र सरकारने जैन धर्मीयांचे पवित्र स्थान श्री सम्मेद शिखरजी सिध्दक्षेत्र जि. गिरडीह राज्य झारखंड, जैन धर्मीय काशी  येथे पर्यटन क्षेत्र म्हणून जाहिर केले याचा निषेध करण्यासाठी शहरातील सर्व जैन धर्मीय बांधवानी आज बुधवार म्हसवड गावचा बाजार दिवस असताना  शहरात सर्व  जैन धर्मीय बांधवानी आपली  दुकाने बंद ठेवून     निषेध मोर्चा काढला  व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदनाद्वारे  जैन धर्मीयांच्या भावना कळविण्यात आल्या   या निवेदनाची प्रत मोर्चाद्वारे  म्हसवड पोलीस ठाण्याचे सपोनि राजकुमार भुजबळ यांना देण्यात आली यावेळी जैन धर्मीय समाजाचे  अध्यक्ष महावीर व्होरा,उपाअध्यक्ष ,महेंद्रकुमार,मोडासे, नितीन दोशी,प्रीतम शहा,संतोष दोशी,अजित  गांधी गांधी ,राजकुमार तिवाटणे,डॉ राजेंद्र मोडासे,परेश व्होरा समता गांधी  याचबरोबर चारशे च्या वर समाज जैन धर्मीय बांधव उपस्थित होते   पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांना लिहीलेल्या निवेदनात म्हटले  आहे की आम्ही खालील सह्या करणारे सकल जैन समाज म्हसवड येथील जैन धर्मीय बंधु भगिनी विनम्रपूर्वक निवेदन करतो की, आमचे अतिशय सिध्दक्षेत्र काशी श्री सम्मेद शिखरजी गिरीडीह झारखंड हे प्राचीन काळापासून प्रसिध्द व श्रध्दास्थान असलेले तिर्थकरांचे वंदनीय सिध्दक्षेत्र आहे.
याबाबत केंद्र सरकारच्या वन मंत्रालयाने सदरील क्षेत्र हे पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे. हे आमचे श्रध्दास्थानावर आमचेवर खूप मोठे धार्मिक संकट निर्माण झालेले आहे. आम्ही भगवंताची दैनंदिन पुजा अभिषेक वगैरे विधीवत अतिशय पवित्राने करीत असतो. सदर सिध्दक्षेत्र दर्शनास भाविक हजारो किलोमीटर वरून येत असतात. असे असताना प्राचीन सिध्दक्षेत्रास पर्यटन क्षेत्र जाहीर केल्याने त्या ठिकाणी मांस, मद्य विक्री होईल व आमचे सिध्दक्षेत्राचे पावित्र धोक्यात येऊन आमचे श्रध्दास्थानावर त्याचा परिणाम होणार आहे. जैन धर्मीयांची काशी म्हणून त्यांची ख्याती संपुष्टात येईल व आमचे सदर सिध्दक्षेत्रावरील भगवंताचे मंदीर, मुर्ती यांस दर्शनास व अभिषेक, पुजा यांस बाधा पोहोचेल. यास्तव कृपया केंद्र सरकारने श्री सम्मेद शिखरजी सिध्दक्षेत्र गिरीडीह झारखंड याचा पर्यटन क्षेत्र जाहिर केलेचा निर्णय त्वरित परत घेऊन आमचे सिध्दक्षेत्राचे अस्तित्व कायम ठेवणेस कृपया आपण हस्तक्षेप करून पर्यटन स्थळाचा निर्णय रद्द करावा असे आम्ही अतिशय विनंतीपूर्वक व नम्रपणे हे निवेदन आपणांस देत आहोत . यास्तव आम्ही सर्व जैन समाज बांधव दि. २१ डिसेंबर २०२२ आमचे सर्व व्यवहार बंद ठेवून निषेध व्यक्त करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!