सैनिक योद्धा”* *या पुरस्काराने श्री प्रशांत कदम (माजी सैनिक) यांचा गौरव नामदार शंभूराजे देसाई यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

बातमी Share करा:

व्हिजन २४ ताष न्युज (संपादक:अहमद मुल्ला )

कुलदिप मोहिते
कराड

     दै. महाराष्ट्र न्यूज यांच्यावतीने सैनिक फेडरेशन सातारा जिल्हा अध्यक्ष प्रशांत कदम (माजी सैनिक) यांना दै. महाराष्ट्र न्यूज च्या *सैनिक योद्धा गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले
       बुधवार दि.17/01/2024 रोजी हा पुरस्कार नामदार शंभूराज देसाई शुल्क उत्पादन मंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री सातारा जिल्हा व निवासी उप जिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

प्रशांत कदम यांची सामाजिक जीवनातील कारकीर्द फार उल्लेखनीय आहे
      प्रशांत कदम (माजी सैनिक) हे वडगाव (उंब्रज) तालुका कराड येथील सुपुत्र आहेत सैन्य दलात त्यांनी जम्मू-काश्मीर अतिदुर्गम भागात डोडा जिल्हा , नवशेरा सेक्टर नारिया, राजौरी, बटोत , राजस्थान येथील बिकानेर, अमृतसर ,आसाम, हैदराबाद ,पुणे, उत्तर प्रदेश मेरठ अशा विविध ठिकाणी सतरा वर्षे सेवा बजावली व 2007 साली सेवानिवृत्त झाले सेवानिवृत्तीनंतर यशवंत चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना त्यांनी केली राष्ट्र उभारणीसाठी सशक्त तरुण, तरुणी ची फौज निर्माण व्हावी व सैन्य दलात भरती होणाऱ्या युवकांसाठी भरतीपूर्वक प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली व 2008 पासून शालेय विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेत प्रथम द्वितीय, तृतीय, क्रमांक मिळवणाऱ्या व स्पोर्ट मध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम देऊन सन्मानित करत आहेत ते गावातील ग्राम विकास सोसायटीचे चेअरमन व जिल्हा सैनिक आघाडीचे उपाध्यक्ष होते व आता सैनिक फेडरेशनचे सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत आहेत सैनिक फेडरेशन मध्ये .ब्रिगेडियर सुधीर सावंत माजी खासदार अध्यक्ष सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य यांच्याबरोबर काम करत असताना आजी-माजी सैनिक त्यांचे कुटुंबिय शहीद जवान कुटुंबिय यांच्या समस्या सोडवण्यासाठी व त्यांना सन्मानाची वागणूक समाजामध्ये, प्रशासनामध्ये मिळवून देण्यासाठी केलेले काम हे बहुमूल्य आहे मालमत्ता कर सूट, स्वस्त धान्य रेशन मिळण्याबाबत, जमीन रस्ते समस्या संदर्भात, टोल माफी मिळणे बाबत अशा आजी-माजी सैनिकांच्या प्रश्नाला वाचा फोडली या समस्या सोडवण्याची वेळोवेळी मंत्री महोदय व प्रशासनाला निवेदन देऊन विशेष प्रयत्न केले या पाठपुराला यश मिळाल्यावर अमृतवीर जवान सन्मान अभियान राबवण्यासाठी दिनांक 13/ 4/2022 रोजी महाराष्ट्र शासन निर्णय झाला व संपूर्ण महाराष्ट्राराज्यात मध्ये सर्व जिल्ह्यामध्ये खास करून सातारा जिल्हा व सर्व 11 तालुक्यांमध्ये याची सुरुवात झाली व महराष्ट्रा राज्यात प्रथम कराड तालुक्यामध्ये सैनिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तहसीलदार कार्यालयामध्ये सैनिक कक्ष त्यांच्या प्रयत्नाने स्थापन करण्यात आले व माजी सैनिक संघटना प्रतिनिधी कराड तालुका म्हणुन शासकीय कमिठीवर त्यांची निवड झाली

         प्रशांत रघुनाथ कदम माजी सैनिक यांनी आपले पूर्ण आयुष्य देश सेवा आणि समाजासाठी व्यतीत केले आहेते एक उत्तम सैनिक, उत्तम समाजसेवक आणि उत्तम राजकीय नेते म्हणून समाजातील सैनिकांच्या, लोकांच्या मनामध्ये त्यांनी आपली जागा निर्माण केली आहे
सैनिक हो तुमच्यासाठी ,जय जवान जय किसान..,भारत माता की जय…, वंदे मातरम.., जय हिंद.., असे त्यांचे जीवनाचे ब्रीदवाक्य आहे

.          प्रशांत कदम आपल्या मनोगतात म्हणाले की हा सैनिक योध्दा मिळालेला पुरस्कार सैनिक फेडरेशन व सर्व पदाधिकारी व सातारा जिल्ह्यातील सर्व आजी/माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय,शहीद जवान कुटुंबीय व ज्या व्यक्तींनी, मान्यवरांनी, अपेक्षित व अनपेक्षित पणे मदत केली व या सर्वांनी मदत केली म्हणून मी सैनिक व समाजाला न्याय देऊ शकलो व त्यांच्या समस्या सोडवू शकलो म्हणून हा पुरस्कार मी त्यांना समर्पित करतो असे गौरव उदगार काढले
          याप्रसंगी . सचिन बर्गे दै महाराष्ट्रन्यूज संपादक, . मधुसूदन पतकी, कार्यकारी संपादक, . चंद्रकांत पवार निवासी संपादक, . कैलास थोरवडे कराड ब्युरो चीफ , माजी सैनिक . सदाशिव नागणे अध्यक्ष सैनिक फेडरेशन कराड तालुका ,.विजय पवार अध्यक्ष प्यारा मिलिटरी फोर्सेस कराड तालुका, .मनोज चव्हाण उपाध्यक्ष कोरेगाव तालुका सै. फे., .प्रकाश मसुगडे कार्याध्यक्ष पाटण तालुका सै.फे., . भीमराव सावंत उपाध्यक्ष माजी सैनिक संघटना चिखली,. राजाराम माळी एक्स सुबेदार माजी सैनिक संघटना चिखली, .बाबुराव शिवदास माजी सैनिक संघटना चाफळ, यशवंत जगदाळे, अशोक मोरिके,.शिवाजी मोरे,सर्व विभागातील मान्यवर व माजी सैनिक उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!