म्हसवड येथे शिवसेना प्रमुख मा बाळासाहेब ठाकरे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी !
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड दि प्रतिनीधी
२३ जानेवारी रोजी शिवसेना प्रमुख मा बाळासाहेब ठाकरे यांची जयंती माण तालुका व म्हसवड शहर शिवसेना यांचे वतीने विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली
यावेळी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख शिवदास केवटे व युवासेना म्हसवड शहर प्रमुख सोमनाथ कवी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेना प्रमुख मा बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले तसेच सभासद नोंदणी करणेत आली
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख बाळासाहेब मदने, उपतालुका प्रमुख शिवदास केवटे, महिला संघटीका पुनम माने , युवासेना शहर प्रमुख सोमनाथ कवी, युवासेना उपशहर प्रमुख अदित्य सराटे, सिध्दनाथ कवी, शाखा प्रमुख सचिन चिंचकर, सतिश विरकर, विभाग प्रमुख बापु कबीर, किरण विरकर, शिवाजी माने, प्रतिक ओतारी, यासिन शेख, व शिवसैनिक मोठ्या संखेने हजर होते