शिवाजीराव यादव यांची महाराष्ट्र प्रदेश राजीव गांधी पंचायत राज्य संघटनेच्या *सचिव* पदी नियुक्ती झाल्याबद्दल *सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी कडून सत्कार
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला)
म्हसवड
*माण तालुक्याची मुलुख मैदानी तोफ* मा.शिवाजीराव यादव यांची महाराष्ट्र प्रदेश राजीव गांधी पंचायत राज्य संघटनेच्या *सचिव* पदी नियुक्ती झाल्याबद्दल *सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी कडून सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण(नाना), जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, युवक जिल्हाध्यक्ष अमरजित कांबळे, महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, प्रदेश महिला सरचिटणीस धनश्री महाडिक,जेष्ठ नेते विजयराव कणसे, अल्पसंख्याकचे प्रदेश उपाध्यक्ष झाकीर पठाण, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, जेष्ठ नेते एम के भोसले, शिवाजीराव भोसले माण तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने इ.सह जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष, तसेच जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.