शिवसेना कार्यकर्त्यांनो कामाला लागा !आपले खासदार आणि आमदार निवडून आणल्या खेरीज विकास होणार नाही :अनंत गीते म्हसळा तालुका शिवसेना उद्धव ठाकरे गट कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न.

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
सुशील यादव 
रायगड : प्रतिनिधी

शिवसेना कार्यकर्त्यांनो कामाला लागा !आपले खासदार आणि आमदार निवडून आणल्या खेरीज विकास होणार नाही ?

शिवसेना नेते माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी कार्यकर्ता संवाद मेळाव्यातून मार्गदर्शन करताना आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

              शिवसेना नेते माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वूमीवर म्हसळा  तालुका शिवसेना कार्यकर्त्यां जवळ संवाद मेळाव्यातून संवाद करताना आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे .शिवसैनिकांनी आता कामाला लागा असे आदेश देत रायगड लोकसभा निवडणुकीत आपण स्वतः उमेदवार असल्याचे जाहीर करताना श्रीवर्धन विधानसभा निवडणुकीचे उमेदवार जिल्हा प्रमुख अनिल नवगणे हेच असतील असे जाहीर केले. मार्गदर्शन करताना गीते यांनी इंडिया आघाडीचा कुठेही उल्लेख न करता या नंतर तालुक्यात निवडणूकी बाबत मोठ मोठे मेळावे आयोजित करण्यात येतील असे सांगुन   कुरघोडी,गटातटाचा शिवसेनेवर काहीही परिणाम झाला नसुन उलटपक्षि सर्वधर्मीय लोकांचा मातोश्रीवर पक्ष प्रवेश करण्याचा ओघ सुरूच असल्याचे निदर्शनास आणून देतानाच शिवसेना ही संघटना आहे त्याचे कुटूंब प्रमुख उध्दव ठाकरे असल्याचे सांगीतले.शिवसैनिकांनी पदाचे महत्त्व जोपसाले पाहिजे असा सल्ला देताना शिवसैनिक निवडणूकीत यश संपादन करण्यासाठी १०० टक्के कसोटीला उतरतील अशी आशा व्यक्त केली.गीते पुढे बोलताना आपल्या पक्षाचे खासदार आणि आमदार असल्याखेरीज विकास काम होणार नाहीत.विकास करायचा आहे तर शिवसैनिकांनी न डगमगता निवडणुकीला सामोरे जावून आपला हक्काचा खासदार आणि आमदार निवडून आणावाच लागेल असेही आवाहन केले.

        शिवसेना नेते माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी म्हसळा येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्यातून मार्गदर्शन करताना आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.म्हसळा तालुका पाचगाव आगरी समाज सामाजिक सभागृहात आयोजित शिवसेना कार्यकर्ता संवाद मेळाव्यात पक्ष नेते अनंत गीते यांनी शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना निवडणूक प्रचाराचे कामाला लागा असे आदेश देत निवडणूक कशी जिंकायची या बाबत मार्गदर्शन केले आहे.आयोजीत मेळाव्यात जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, उपजिल्हाप्रमुख नंदु शिर्के,तालुका प्रमुख सुरेश कुडेकर,कृष्णा म्हात्रे,जिल्हा अधिकारी चेतन पोटफोडे, सुधाकर ढाणे, महीला प्रमुख सायली सुगदरे, स्वाती घोसाळकर, दिलीप करंदीकर,विभाग प्रमुख गजानन शिंदे,संघटक अमित महामुणकर,अनिल महामुणकर,दिपल शिर्के, राजाराम तीलटकर,महीला आघाडी प्रमुख रिमा महामुणकर,उपप्रमुख निशा पाटील,नगरसेविका राखी करंबे,अजय करंबे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

*      देशातील राज्या,राज्यात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरवात झाली असताना त्यात महाराष्ट्र राज्य एक पाऊल पुढे आहे.पंच वार्षिक लोकसभा निवडणुकीची मुदत मार्च २०२४ पर्यंत संपत आल्याने इंडिया आघाडी घटक पक्ष आणि भाजप युती सरकारमधील घटक पक्ष लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याआधीच  मतदार संघात चाचपणी करून निवडणुकीच्या आखाड्यात उतरत आहेत.रायगड लोकसभा मतदार संघात खास करून भाजप युती सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी मधील शिवसेना उद्धव ठाकरे गट हे दोन प्रमुख पक्ष पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत.सन २०१४ आणि सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यात जोरदार लढत पहायला मिळाली होती.सन २०१४ मध्ये अनंत गीते यांनी अवघ्या दोन हजार मतांनी विजय मिळवला होता तर सन २०१९ च्या निवडणूकीत खासदार सुनिल तटकरे यांनी ३० हजार मतांचे फरकाने मागील पराभवाचा वचपा काढला होता.

            आता रायगडात राजकारणाने खुप कलाटणी घेतली आहे.आजुन पुलाखालून बरेच पाणी वाहून जाणार आहे असे वाटत असताना इंडिया आघाडी घटक पक्षातील प्रमुख पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे गट प्रचारात सक्रिय झाला आहे.आजुन तरी कोणाची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली नसली तरी युतीतील आणि आघाडी मधील प्रमुख पक्ष नेत्यांचे वजन बघता शिवसेना नेते,माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यात आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)प्रदेश अध्यक्ष तथा विद्यमान खासदार सुनिल तटकरे यांच्यातच सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कडवी झुंज बघायला मिळणार आहे.खासदार सुनिल तटकरे यांच्या विकासाचा झंझावात बघता त्यांचा निवडणूक प्रचार जिल्हयातील सात विधानसभा मतदार संघात सुरूच आहे तर दुसरीकडे पाच वेळा लोकसभा खासदार आणि दोन वेळा केंद्रीय मंत्री राहिलेले अनंत गीते हे खासदारकीचा षटकार मारण्यासाठी प्रयत्नात आहेत. वेळ जवळ येवुन ठेपलीच आहे.निवडणूकीत काय होईल ते सांगता येत नाही परंतु विद्यमान खासदार सुनिल तटकरे हे आपला विजय आबाधित राखुन मोदी सरकार मध्ये मंत्री पदावर विराजमान होणार कि इंडिया आघाडी मधील शिवसेना उद्धव ठाकरे गट नेते संभावी उमेदवार अनंत गीते बाजी मारणार याची जनतेला महीने दोन महिने तरी वाट पाहावी लागणार आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!