उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम कराड उत्तर यांना शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट यांच्याकडून विविध मागण्यांचे निवेदन

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते( शिवडे) प्रतिनिधी
उंब्रज ता कराड:
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचे वतीने .संजय भोसले शिवसेना उपतालुकाप्रमुख कराड उत्तर यांच्या नेतृत्त्वाखाली आज दि.२१ डिसेंबर रोजी .उपविभागीय अभियंता सा.बा.उपविभाग उत्तर कराड यांना खालील प्रमाणे विविध मागण्यांचे बाबत निवेदन देण्यात आले त्यामध्ये 1)मल्हारपेठ ते पंढरपूर रस्त्यावरील आपघात होणाऱ्या ठिकाणांवरती गतीरोधक किंवा वाहनांची गती कमी होणे साठी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी व सुचणा फलक लावण्यात यावेत 2)शिवडे फटा महाकुबाई मंदिरासमोर,हनुमानवाडी,वडोली, कोरेगाव फटा याठिकाणी गतीरोधक किंवा पर्यायी व्यवस्था करण्यात यावी कारण या ठिकाणी आजपर्यंत बरेच अपघात झालेले आहेत त्यामध्ये बऱ्याच लोकांना आपले जिव गमवावे लागले आहेत तसेच बरेच जण कायमचे अपंग झाले आहेत व या रस्त्यावर प्रवास करताना व स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी यांना याचा खुप त्रास होत असतो त्यामुळे शिवसेना व शिवडे, हनुमानवाडी च्या ग्रामस्थ यांच्या कडून त्यांच्या सही सकट हि मागणी उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग उत्तर कराड यांना करण्यात आली आहे     जर दिलेल्या वरील निवेदनाप्रमाणे बांधकाम विभाग यांनी योग्य ती व्यवस्था  केली नाही तर शिवसेनेचे वतीने शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल याची सर्व जबाबदारी संबंधित विभागाची राहिल असा इशारा कराड उत्तर उपतालुकाप्रमुख संजय भोसले यांनी यावेळी दिला यावेळी उपस्थित जीवन गायकवाड गणेश जांभळे इतर शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!