शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा अभिनव उपक्रम: श्रावणी सोमवारी भाविकांना मोफत झाडांचे रोप वाटप

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

कराड (प्रतिनिधी: कुलदीप मोहिते)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ओगलेवाडी विभागाच्या वतीने शिवकालीन सदाशिवगड येथे शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त भाविकांसाठी एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. ह्या उपक्रमाअंतर्गत गडावर येणाऱ्या भाविकांना मोफत वृक्षांचे रोप वाटप करण्यात आले. या उपक्रमात 1000 विविध प्रकारच्या फुलांच्या झाडांचे रोप वितरित करण्यात आले.

या कार्यक्रमास भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, आणि असंख्य भाविकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. यासोबतच उपवासासाठी शाबूदाण्याच्या चिवड्याची हजारो पाकिटे वाटण्यात आली, ज्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

कार्यक्रमादरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाचाही प्रारंभ करण्यात आला, ज्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सर्व कार्यक्रमामुळे वातावरणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आणि कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवसेनेचे ता.प्रमुख संजय भोसले, उप ता.प्रमुख जीवन गायकवाड, युवासेना ता.आधिकारी विक्रम पिसाळ, उप ता.आधिकारी मिलिंद तोडकर, ओगलेवाडी शहर प्रमुख अमजद मुसांडे, विभाग प्रमुख संजय बांदल, पोपटराव कांबळे, तालुका संघटक समीर शेख, गणेश जांभळे, तानाजी चन्ने, जयवंत बाबर, संतोष सकटे, अशोक अंगरखे, नंदकुमार भंडारे, सुभाष शिलवंत, आणि अभिजीत माने यांनी मोलाचे योगदान दिले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!