कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळावा, शिवसैनिकांची मागणी

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

कुलदीप मोहिते (प्रतिनिधी )
कराड : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मिळावा, अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय भोसले आणि स्थानिक शिवसैनिकांनी केली आहे.

लोकसभा निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला सोडण्यात आला होता, तरी शिवसैनिकांनी त्यावेळी जोमाने प्रचार केला होता. मात्र, आता विधानसभा निवडणुकीत कराड उत्तर मतदारसंघ शिवसेनेला मिळावा, अशी स्थानिकांची जोरदार मागणी आहे. शिवसैनिकांचे म्हणणे आहे की, विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांच्याबद्दल मतदारसंघात मोठी नाराजी आहे, त्यामुळे शिवसेनेला संधी मिळाल्यास येथे शिवसेनेचा उमेदवार विजय मिळवू शकतो.

शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांनी कृष्णा खोऱ्यात विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. यामध्ये इंदोली उपसा सिंचन योजना, हंनबरवाडी, धनगरवाडी, तसेच पाण्याच्या पाईपलाईन, स्मशानभूमी, रस्ते आणि नाल्यांच्या कामांचा समावेश आहे. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी गावोगावी मशाल चिन्ह पोहोचवण्याचे काम करत, सदस्य नोंदणी मोहिमेसाठी सक्रिय कामगिरी बजावली आहे.

याआधी शिवसेना-भाजप युतीच्या काळात कराड उत्तर हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता, त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!