शिवसेना शेतकरी सेना प्रदेश उपाध्यक्ष प्रा. विश्वंभर बाबर यांची नियुक्ती.
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड….प्रतिनिधी
शिवसेना प्रणित शेतकरी सेनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार विजेते प्रा. विश्वंभर सोपान बाबर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या या महत्त्वपूर्ण शेतकरी सेना विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्त होण्याचा मान देवापूर म्हसवड येथील कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांना मिळाला आहे.
सदरचे नियुक्तीपत्र शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचे हस्ते तसेच शिवसेना शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष धनंजय भास्करराव जाधव यांच्या उपस्थितीत विश्वंभर बाबर यांना बाळासाहेब भवन मुंबई येथे प्रदान करण्यात आले. तुम्हाला मिळालेल्या पदाचा उपयोग महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या हितासाठी तसेच त्यांना न्याय देण्यासाठी करा. याबरोबरच या माध्यमातून शिवसेना शेतकरी संघटन विभाग वाढवून वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या शिकवणीचा प्रचार व प्रसार करण्याबाबतचे मार्गदर्शन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रा. बाबर व उपस्थित मान्यवरांना केले. मिळालेल्या संधीचे सोनं करून शेतकरी हितासाठी शिवसेनेच्या माध्यमातून पक्ष संघटन वाढविण्याचा निर्धार प्रा. विश्वंभर बाबर यांनी या निमित्ताने व्यक्त केला. याबरोबरच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी उपयोगी योजना तळागाळातील गरजूपर्यंत पोहोचवण्या मानस प्रा.बाबर यांनी व्यक्त केला.
यावेळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराजे देसाई, जल व मृदूसंधारण मंत्री नामदार संजय राठोड , कृषी राज्यमंत्री नामदार आशिष जयस्वाल शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश अध्यक्ष धनंजय जाधव, सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे,सहसंपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे इत्यादी मान्यवरांनी प्रा. बाबर यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी माण तालुक्यातील माजी नगरसेवक विकास गोंजारी, बाळासाहेब आटपाडकर, वसंतराव शिर्के दाऊद मुल्ला इत्यादी मान्यवर उपस्थित होते. शिवसेना सातारा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माण तालुका अध्यक्ष समीर जाधव व बाळासाहेब मुलाणी , कृषी,शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी मिळालेल्या नवीन नियुक्ती बद्दल प्रा. विश्वंभर बाबर यांचे अभिनंदन केले.