शिवसेनेच्या नेत्या मा. सुषमाताई अंधारे यांचे आज म्हसवड मध्ये व्याख्यान
व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड /प्रतिनिधी :
–भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न,बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंती निमित्त आठ दिवस म्हसवड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समीती व जयभीम युवक मंडळ यांच्या वतीन भिम उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उत्सवात शेवट आज शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता महाराष्ट्रातील आघाडीच्या सामाजिक व्याख्यात्या मा सुषमाताई अंधारे यांचे भारतीय संविधान या विषयावर व्याख्यान होणार आहे तरी म्हसवड व परिसरातील नागरिकांनी उपस्थित रहावे जयंती उत्सव समीती समीतीच्या वतीने करण्यात आले आहे
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जयंती उत्सव समीतीच्या वतीने १४ एप्रिल ते २१ एप्रिल या आठ दिवसात विविध सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले होते यामध्ये मिरवणूक, लेझीम स्पर्धा, महिलांसाठी खेळ रमाई पैठणीचा, रक्तदान शिबीर, भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा फुले शाहू आंबेडकर यांच्या विषयी रोहित देशमुख यांचे व्याख्यान, असे विविध कार्यक्रम घेण्यात आले होते या उत्सवाचा शेवट शिवसेनेच्या नेत्या व महाराष्ट्रातील आघाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या मा सुषमाताई अंधारे यांचे व्याख्यान आज शुक्रवार दिनांक १८ एप्रिल रोजी म्हसवड नगरपालिकेच्या समोर सायंकाळी ७ वाजता होणार आहे तरी फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी ,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे प्रेमी नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे