व्हिजन २४ तास (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड एकात्मिक बालविकास नागरी प्रकल्प सातारा पुर्व अंतर्गत आज म्हसवड येथे बाल आनंद मंदिर अंगणवाडी क्रमांक 1(83) येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला
या कार्यक्रमास म्हसवड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष, आहिंसा नागरी पतसंस्थेचे चेअरमन मा.श्री नितीनभाई दोशी , म्हसवड नगरपालिकेच्या माजी.उपनगराध्यक्षा सौ.स्नेहल सुर्यवंशी मॅडम तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अंगणवाडीतील बाल चिमुकल्या विद्यार्थीनी छत्रपति शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित फारच सुंदर भाषणे केली.
.यावेळी माजी नगराध्यक्ष श्री नितीनभाई दोशी म्हणाले अंगणवाडीतील मुले खरोखरच अत्यंत कुशाग्र ,बुद्धिमान आहेत. या अंगणवाडीतील सेविका सय्यद मॅडम यांना आधुनिक काळातील राजमाता जिजाऊ म्हणण्यास काहीही हरकत नाहो कारण राजमाता जिजाऊंनी एक शिवाजीमहाराज घडवले होते सय्यद मॅडम प्रत्येक घरातील एक शिवाजी घडवत आहेत. सय्यद मॅडम यांनी एक खंत व्यक्त केली होती मुलांना खेळाचे साहित्य नाही यावर लगेच नितीन दोशी यांनी जाहीर केले कि लवकरच शाळेच्या आवारात सुंदर गार्डन सोबत खेळाचे साहित्य ही दिले जाणार आहे.
यावेळेस उपनगराध्यक्षा सौ.स्नेहल सुर्यवंशी मॅडम म्हणाल्या फक्त शिवजयंतीलाच नाही तर छत्रपती शिवरायांचा आदर्श आपण रोजच स्मरणात ठेवावा व त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालावे अंगणवाडीतील मुलांनी उत्तरोत्तर अशीच प्रगती करावी. सेविका शमीम सय्यद मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या कार्यक्रम घेण्यामागे उद्देश हाच होता की ज्या प्रमाणे छत्रपती शिवाजीमहाराज घडले त्यांचा आदर्श अंगणवाडीतील चिमुकल्यांनी घ्यावा व अंगणवाडीतील मुलांनी भविष्यात दैदिप्तमान यश संपादन करावे.. याप्रसंगी अंगणवाडीतील भाषण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप नितीनशेठ दोशी व सौ. स्नेहल सुर्यवंशी यांच्या शुभ हस्ते देण्यात आले..यावेळी बाल शिवाजी बाल राजमाता जिजाऊ व बाल सोयराबाई यांच्या वेशातील बालचिमुकले कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरली. कार्यक्रमा करिता मानदेश तरंग वाहिनीचे अनुप गुरव, अहिंसा बँकेचे पतंगे साहेब व मोठ्या संखेने पालक वर्ग उपस्थित होता या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे आभार मदतनीस अश्र्विनी गुरव मॅडम यांनी मानले. पालकवर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले.