सिद्धनाथ हायस्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात; मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी दुमदुमला परिसर

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड | प्रतिनिधी
दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या पावन प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे तसेच शिवकालीन शस्त्रांचे पूजन शाळेचे प्राचार्य प्रवीण दासरे सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमास शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होता. यामध्ये संतोष देशमुख सर, दिलीप माने सर, अमोल म्हेत्रे सर, महादेव नलवडे सर, सुजाता मोहिते, शारदा सूर्यवंशी, बाळासाहेब सरतापे सर, गोटे सर, ओतारी सर, लक्ष्मण चव्हाण, निलेश सरतापे आदी मान्यवरांचा समावेश होता.
शिवजयंतीनिमित्त माणदेश मर्दानी स्पोर्ट्स अँड मार्शल आर्ट अकॅडमी यांच्या वतीने पारंपारिक मर्दानी खेळांचे नेत्रदीपक प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. लागती काठी, दांडपट्टा, भवरा, भाला आदी खेळप्रकारांनी उपस्थितांची मने जिंकली.
प्रात्यक्षिक सादर करणारे विद्यार्थी—शाश्वत नलावडे, आदर्श नलावडे, अद्वैक खंदारे, संस्कृती भोज, स्वरांजली सूर्यवंशी, सिद्धी कोडलकर, संस्कृती सूर्यवंशी, रचना साळुंखे, धनश्री लोखंडे, विराज कांबळे, संस्कार पडळकर, विश्वजीत मेळावणे, ओम सराटे, आर्यन पिसे, स्वराज सूर्यवंशी, देवराज डोंबे, श्रीपाद लोखंडे, ओम म्हेत्रे, प्रशांत भोसले, अरुण कुमार खंदारे—यांनी शिवकालीन शौर्यकलेचे सादरीकरण केले. विशेषतः देवराज डोंबे यांच्या शिवगर्जनेने परिसर दुमदुमून गेला.
या सर्व खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक बंडोपंत लोखंडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
इतिहास, शौर्य आणि संस्कृती यांचा संगम साधणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *