सातारा जिल्ह्याचे शिंपी समाज अध्यक्ष इंजि. सुनील पोरे नामदेव समाज भूषण पुरस्काराने सन्मानित

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
पुणे येथील नामदेव व्हिजन फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय “नामदेव समाज भूषण” पुरस्कार यंदा सातारा जिल्ह्याचे शिंपी समाज अध्यक्ष इंजि. सुनील पोरे यांना प्रदान करण्यात आला. रविवारी पुण्यातील अल्पबचत भवन येथे पार पडलेल्या या भव्य कार्यक्रमात नामदेव समाजाचे माजी आमदार आदरणीय प्रकाशजी देवळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, नामदेव प्रतिमा आणि सन्मानपत्र प्रदान करून पोरे यांचा गौरव करण्यात आला.

राज्यभरातील नामदेव समाजाच्या सुमारे सात हजार बंधू-भगिनींच्या उपस्थितीत या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. समाजासाठी आणि समाजाबाहेर केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत पोरे यांना हा पुरस्कार देण्यात आला. या निमित्ताने त्यांच्या सामाजिक कार्याचा राज्यभरातील समाजबांधवांनी एकत्र येऊन सन्मान केला.

या प्रसंगी नासपचे राज्याध्यक्ष संजय नेवासकर, सरचिटणीस डॉ. अजय फुटाणे, मुख्य ट्रस्टी राजेंद्र पोरे, रवींद्र रहाणे, नाशिक पिंपरी-चिंचवड नासप अध्यक्ष एकनाथ सदावर्ते, संजय सारोळकर, डॉ. राजेश्वर सुपेकर, डॉ. स्वप्ना सुपेकर, ईश्वर धिरडे (नागपूर), भास्कर टोंपे, वनेश खैरनार, अतुल मानकर, नामदेव व्हिजन फाउंडेशनचे महेश मांढरे, कैलास नेवासकर, राजकिशोर सुपेकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते

पुरस्कार स्वीकृत करताना पोरे म्हणाले, “हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही तर संपूर्ण समाजाचा आहे. समाजासाठी काम करत असताना मिळालेला हा सन्मान माझ्या जबाबदारीत वाढ करतो. यापुढे अधिक उमेदीने समाजासाठी काम करेन. आपणा सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांचा मी मनपूर्वक स्वीकार करतो. आपल्या प्रेमामुळेच हे सर्व शक्य झाले आहे, हे प्रेम असेच राहावे, हीच नामदेव चरणी प्रार्थना आहे.”

पुरस्कार सोहळ्याने नामदेव समाजातील एकता आणि बंधुतेचा उत्साह अनुभवायला मिळाला. समाजाच्या प्रगतीसाठी एकत्रित येऊन कार्य करण्याचा संदेश देत या सोहळ्याने प्रेरणा दिली.

या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी पोरे यांचे कार्य व त्यांची सामाजिक बांधिलकी याबद्दल गौरवोद्गार काढले आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!