खंडाळा तालुका शिंपी समाज कार्यकारिणी जाहीर..
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड :
खंडाळा तालुक्यातील शिंपी समाजाची बैठक नुकतीच लोणंद येथील संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिरात नामदेव समाजोन्नती परिषदेचे सातारा जिल्हा अध्यक्ष इंजिनिअर सुनील पोरे साहेब यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी खंडाळा तालुक्यातील बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते यावेळी सर्वानुमते लोणंद येथील विद्यमान नगरसेवक प्रवीण बबनराव व्हावळ यांची अध्यक्षपदी भूषण मोहन लंगडे ( बावडा) कार्याध्यक्ष चंद्रशेखर केशव उत्तरकर (शिरवळ) उपाध्यक्ष तर गजानन दिगंबर लंगडे सरचिटणीस सह पंधरा सदस्यांची एकमताने निवड करण्यात आली यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष पोरे यांनी काळाची पावल ओळखून सकल समाज एका झेंड्याखाली एकत्र येणे आवश्यक असुन त्याप्रमाणे जिल्ह्यातुन सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे यावेळी बोलताना नुतन तालुका अध्यक्ष प्रवीण व्हावळ यांनी समाजासाठी जास्तीतजास्त योगदान देऊन धाग्याधाग्यात समाज गुंफणेसाठी जिल्हा कार्यकारिणीस मदत करणार असलेचे सांगितले प्रास्ताविक भूषण लंगडे यांनी केले तर आभार प्रदर्शन उद्योजक मनोज बारटक्के यांनी केले नूतन कार्यकारिणीचे राज्याध्यक्ष संजीव तुपसाखरे, जिल्हाध्यक्ष सुनील पोरे, राज्य उपाध्यक्ष संजय नेवासकर, सरचिटणीस अजय फुटाणे , पत्रकार सुभाष भांबुरे आदींनी अभिनंदन केले…