श्री जानुबाई विद्यालय विरळी विद्यालयात तीन दिवसाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड :

    विरळी  तालुक  माण   येथील महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था सांगलीचे श्री जानुबाई विद्यालय विरळी*  विद्यालयात तीन दिवस चाललेले वार्षिक स्नेहसंमेलन  विविध मनोरंजन कार्यक्रमाने  उत्साहात  संपन्न झाले

*पहिल्या दिवसाच्या स्नेहसंमेलनाची सुरुवात विविध वेशभूषा व कला दर्शनानेयुक्त शोभा यात्रेने झाली*प्रभात फेरीनंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री माने के. के.सर यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करून आंतरशालेय खो-खो, कबड्डी, वैयक्तिक खेळ, फनी गेम्सची सुरुवात झाली.*

*दुसऱ्या दिवशी सकाळी बाल बाजार व फूड फेस्टिवलचे आयोजनन करण्यात आले.या फेस्टिवलमध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहानेे सहभाग घेतला.या बाजारात चिकन बिर्याणीला फार मोठी मागणी होती,सुमारे बारा हजार रुपयांची उलाढाल बाजार मध्ये झाली.विद्यार्थ्यांची विविध मार्केटिंग कौशल्य यावेळी दिसून आली.यानंतर राहिलेल्या फायनल मॅचेस व फनी गेम्स घेण्यात आले.

* संमेलनाच्या तिसऱ्या दिवशीची सुरुवात पारितोषिक वितरणाच्या समारंभाने झाली पारितोषिक वितरण मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष श्री. बाळासाहेब जाधव सर, मुख्याध्यापक शंभू महादेव हायस्कूल, वाकी वरकुटे यांच्या हस्तेकरण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संचालक श्री. नलवडे यु.सी. सर यांनी केले,यानंतर समारंभास उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.*

*उपस्थितांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. पारितोषिक वितरणाचे सूत्रसंचालन श्री पाटील एस.बी. सर व क्रीडाविभाग श्री. यादव यु.आर. सर यांनी केले. यानंतर विद्यार्थी-विद्यार्थिनी, जाधव गुरुजी,कार्यक्रमाचे पाहुणे जाधव सर, मुख्याध्यापक माने के. के. सर यांची भाषणे झाली व आभार ज्येष्ठ शिक्षक कटरे ए. बी. सर यांनी मानले.*

यानंतर दुपारी विविध कला गुण दर्शनाचा भरगच्च कार्यक्रम पार पडला.यामध्ये विविध नाटिका, रेकॉर्ड डान्स,सामूहिक नृत्य यामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींनी भाग घेतला.कार्यक्रमाला पालकांचा उत्तुंग प्रतिसाद मिळाला.*

*यावर्षी विद्यालयाचे* *मुख्याध्यापक श्री. माने के. के सर 31 मे ला सेवानिवृत्त होत आहेत,विद्यालयाचा सर्व स्टाफ यांनी नेमून दिलेली सर्व कामे तन, मन, धनाने,उत्तमरीत्या पार पाडल्याने संस्थेचे संचालक श्री.नलवडे यु.सी. सर, क्रीडा विभाग सहाय्यक व ज्येष्ठ शिक्षक कटरे ए. बी. सर, विद्यालयाचे प्रसिद्धी विभाग व क्रीडा विभाग प्रमुख यादव यु.आर. सर, हिंदी विभाग प्रमुख पावणे टि.के. सर,विद्यार्थी  निधी विभाग प्रमुख श्री.गोरड डी. एस. सर,सहल विभाग प्रमुख सौ नलवडे एस. एस. मॅडम, एन. एम. एम. एस. व स्कॉलरशिप विभाग प्रमुख सौ. नलवडे व्ही.यु.मॅडम, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री पाटील एस.बी. सर, शालेय पोषण आहार प्रमुख श्री. गळवे बी.पी. सर इतर वेगवेगळ्या  विभागाचे प्रमुख श्री गोरड बी. एस.सर,श्री. गोरड एल.बी.सर, श्री. ढवळे एस. यु.सर,श्री.गलंडे एस.व्ही.सर,श्री. बोरसे एन. एस.सर श्री. पवार एन.डी. सर, श्रीमती ढेरे एन.ए. मॅडम व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले.

*शनिवारी विद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, वस्तीगृहातील विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतरांना मिष्ट आन्नाचे  स्नेहभोजन देण्यात आले.*


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!