अहिंसा पतसंस्था म्हसवड तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शशिकांत म्हमाणे सर यांची निवड

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )

म्हसवड

          येथील  अहिंसा नागरी सह. पतसंस्था म्हसवड मार्फत   शिक्षण क्षेत्रात विशेष  काम करणाऱ्या शिक्षकासाठी आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो या वर्षी  १० जानेवारी रोजी विश्व हिंदी दिनादिवशी देण्यात येणाऱ्या  आदर्श शिक्षक पुरस्काराकरीता सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनी.कॉलेज म्हसवड या विद्यालयातील हिंदी विषयाचे शिक्षक शशिकांत म्हमाणे सर यांची निवड करण्यात आली आहे

             १० जानेवारी रोजी अहिंसा पतसंस्थेचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष नितीनशेठ दोशी यांचे हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे  या पुरस्काराच्या माध्यमातून शिक्षकांना आपल्या ज्ञानदानाच्या माध्यमातून करत असलेल्या चांगल्या कार्याची कोणीतरी दखल घेत असल्याची जाणीव होऊन आपले कार्य अधिक जोमाने उत्साहाने करण्याची प्रेरणा मिळते याच भावनेने अहिंसा पतसंस्था प्रत्येक वर्षी  म्हसवड शहर व परिसरातील शाळेतील गुणवंत शिक्षकाची  त्यांच्या  चांगल्या कार्याची दखल घेऊन त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्याचे कार्य  करत आहे  यावर्षी सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनि.कॉलेज म्हसवडचे हिंदी विषयात पारंगत असलेले मा श्री शशिकांत म्हमाणेसर ,त्यांची हिंदी शिकवण्याची हातोटी ,शाळेतील गरीब विध्यार्थ्याना करत असलेली मदत ,शिस्तप्रियता इ गुणांचे अवलोकन करुन त्यांची आदर्श शिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे १०जानेवारी  जागतिक हिंदी दिना दिवशी अहिंसा पतसंस्थेचे अध्यक्ष नितीनशेठ दोशी यांचे हस्ते प्रशस्तीपत्र शाल श्रीफल व रोख रक्कम देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे

     अहिसा पतसंस्था हि सामाजिक बांधिलकी जपणारी पतसंस्था असून आजपर्यंत अशा अनेक  सामाजिक शैक्षणिक राजकिय क्षेत्रात  विशेष कार्य करणाऱ्या गुणवंत व विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या लोकांचा सत्कार करुन त्यांना प्रेरणा देण्याचे काम या पतसंस्थेच्या माध्यमातून संस्थेचे  अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष नितीन शेठ दोशी यांनी केले आहे


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!