विठ्ठल काटकर कुकुडवाड/वार्ताहर माण तालुक्यातील शेवटचं टोक असणाऱ्या कारखेल ग्रामपंचायतच्या सरपंच पदी शशिकांत गायकवाड व उपसरपंच पदी विश्वनाथ गेजगे यांची बिनविरोध निवड झाली. याबाबत अधिक माहिती अशी की कारखेल ग्रामपंचायत मध्ये पूर्वीच्या सरपंच यांनी पदाचा राजीनामा दिला होता, नंतर रिक्त झालेल्या पदासाठी निवडी घेण्यात आल्या होत्या. या निवडी साठी घेण्यात आलेल्या बैठीकसाठी ९ पैकी ८ ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी शशिकांत गायकवाड यांची सरपंच पदी व विश्वनाथ गेजगे यांची उपसरपंच एकमताने निवड करण्यात आली. निवडी नंतर नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला व गावातून मिरवणूक काढण्यात आली. सरपंच म्हणून काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव असणारे शशिकांत गायकवाड यांची सरपंच पदी झाली म्हणून ग्रामस्थांनी सत्कार केला.सरपंच निवडी नंतर बोलताना शशिकांत गायकवाड यांनी गावाच्या विकास कामासाठी कायम कार्यरत राहणार असून शासनाच्या जास्तीत जास्त योजना गावात राबविण्यात येतील असे त्यांनी सांगितले. शशिकांत गायकवाड हे माण खटाव चे आमदार जयकुमार गोरे यांचे समर्थक आहेत. या कार्यक्रमास सर्व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे आमदार जयकुमार गोरे,सुनील गायकवाड गोपाळ गायकवाड,रविंद्र गायकवाड,शाहजी गायकवाड, नाना गायकवाड, इत्यादी मान्यवर यांनी अभिनंदन केले.