म्हसवड प्रतिनिधी– माण खटाव तालुक्याचा विकास करायचा असेल तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार प्रभाकर घार्गे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे मत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी येथील कोपरा सभेमध्ये बोलताना व्यक्त केले. या वेळेला माण तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख ,डॉक्टर महादेव कापसे, राष्ट्रीय काँग्रेस चे प्रा. विश्वंभर बाबर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाळासाहेब मदने, मनोज पोळ, पृथ्वीराज राजेमाने, माजी नगराध्यक्ष विलासराव माने, माण तालुका पंचायत समितीचे माजी सभापती रामचंद्र माने, म्हसवड चे माजी नगराध्यक्ष तुषार वीरकर, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने , इंजि.बाळासाहेब माने,चंद्रकांत केवटे, विलास रूपनवर,बिरा गोरड,विलास बनगर,संभाजी माने,कांता ढाले,अशोक पिसे,विलास ढगे,भाऊ पुकळे,सोमनाथ खरात,शरद विरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, म्हसवड शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रभाकर घार्गे यांना विजयी करावे,ज्या माणसाला उद्योगांचे ज्ञान आहे. त्यांना निवडून दिले पाहिजे.प्रभाकर घार्गे हे यशस्वी उद्योजक आहेत. त्यांचा वाळूचा व मातीचा व्यवसाय नाही. प्रभाकर घार्गे यांना विजयी करण्यासाठी म्हसवड करांनी गट तट विसरून काम करावे. असेही ते म्हणाले. यावेळी माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख म्हणाले, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ६० हजार महिलांना साडी वाटप केले. असे आमदार सांगतात मग या साडीचे पैसे कुणाच्या खात्यातून पेंड केले हे आमदार जयकुमार गोरे यांनी जनतेला सांगावे. कुठल्या ठेकेदाराने हे पैसे दिले हे जनतेला कळू द्या..ते पुढे म्हणाले,युती सरकारने लाडकी बहीण योजना निवडणूक समोर ठेवून सूरु केली आहे. त्यांनी अगोदरच का ही योजना सुरू केली नाही. असा सवाल उपस्थित केला. यावेळी पृथ्वीराज राजेमाने, डॉक्टर महादेव कापसे, माजी नगराध्यक्ष विलासराव माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले.