आई वडिलांची सेवा हिच सर्वश्रेष्ठ सेवा –  नंदकुमार शेडगे 

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक:अहमद मुल्ला )
कुलदिप मोहिते
कराड: (प्रतिनिधी)

                             “राष्ट्रीय सेवा योजनेमधूनच कर्तुत्व नेतृत्व आणि दातृत्व जन्माला येते.  माणसांनी धनापेक्षा मनाला जास्त जपले पाहिजे. तरच माणसांना माणसांच्या काळजात घर करता येते. आई वडिलांची सेवा हि जगात सर्वश्रेष्ठ सेवा असून आपल्या आई वडिलांची स्वप्ने पूर्ण करा. आईचे हृदय  म्हणजे आपल्या बाळासाठी सदैव वात्सल्याचे अमृत पाझणारा झरा असतो.” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कथा कथनकार . नंदकुमार शेडगे यांनी केले. ते मौजे किवळ येथे आयोजित केलेल्या वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडच्या सिनिअर विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या “विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या” कथाकथन या प्रबोधनपर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

    .           नंदकुमार शेडगे यांनी यावेळी सहल आणि आईचे काळीज या दोन कथा सादर करून रसिकांची मने जिंकली. तसेच त्यांनी आई वरील कविता सादरीकरण करून आईचे महत्व विषद केले.

            या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री रामचंद्र साळुंखे हे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून  दिलीप साळुंखे, . श्रीमती रेखा साळुंखे, . मोहन साळुंखे, . श्रीमती छाया साळुंखे,  संभाजी साळुंखे, मा. श्री. काकासो साळुंखे उपस्थित होते.

            या कार्यक्रमावेळी उपस्थित  श्रीमती संगिता साळुंखे (माई) (सदस्य, केंद्रीय दिशा समिती) मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, माणूस हा अशा प्रबोधनपर कार्यक्रमातून घडतो. श्रवणशक्ती चांगली असेल तर आपणही ज्ञानसंपन्न होतो. आई सर्वांसाठी प्रेरणा असते पण बापही तितकाच महत्वाचा असतो.”

               कार्यक्रमाच्या प्रारंभी शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व एन .एस. एस गीत सादर केले. मान्यवरांचे स्वागत व  प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एस. बोंगाळे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय कु. वैष्णवी ढाणे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन कु.  ज्योती जाधव यांनी केले व सूत्रसंचालन कु. स्नेहल चव्हाण यांनी केले. या शिबिराच्या कथाकथन या समारंभास वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्वयंसेवक तसेच मौजे किवळ येथील सर्व ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!