माण तालुक्यात ग्रामसेवकावर गंभीर विनयभंगाचा गुन्हा दाखल

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड, ता. माण (प्रतिनिधी)
म्हसवड पोलिस ठाण्यात एका महिला शेतमजुराच्या तक्रारीवरून एका ग्रामसेवकाविरोधात गंभीर स्वरूपाचा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी ग्रामसेवक सध्या जावळी तालुक्यातील पंचायत समितीत कार्यरत असून, घटनेमुळे ग्रामविकास विभागात खळबळ उडाली आहे.

ही घटना दिनांक 14 जुलै 2025 रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास मोजे ढाकणी (ता. माण) येथील साबळे यांचे शिवारात घडली. फिर्यादी महिला आपल्या शेतात मका खुरपणी करत असताना मल्हारी पांडुरंग खाडे (वय 48, रा. ढाकणी, ता. माण, जि. सातारा) यांनी चारचाकी वाहनातून तेथे येऊन, उसने दिलेल्या पैशांच्या कारणावरून तिला जवळ बोलावले. त्यानंतर महिलेच्या इच्छेविरुद्ध वर्तन करत तिचा विनयभंग केला. तसेच तिच्या ब्लाउजमध्ये ठेवलेले 2000 रुपये जबरदस्तीने काढून पळून गेला, अशी फिर्यादीत नोंद आहे.

पोलिसांनी भादंवि (BNS) कलम 119(1), 74, 75(2), 75(3), 76, 78(2), 79 अन्वये गुन्हा क्रमांक 232/2025 दाखल केला असून, आरोपी अद्याप फरार आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सोनवणे (म्हसवड पोलीस ठाणे) करीत आहेत.

विशेष म्हणजे, आरोपी हा सध्या जावळी तालुक्यातील पंचायत समितीत ग्रामसेवक पदावर कार्यरत असल्याने, हा प्रकार उघडकीस आल्याने सरकारी सेवकाच्या वर्तणुकीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांकडून या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून आरोपीस अटक करण्याची मागणी केली जात आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!