म्हसवडमध्ये खळबळ : डॉक्टरवर गंभीर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला

म्हसवड | प्रतिनिधी

म्हसवड शहरात खळबळ उडवणारी गंभीर घटना समोर आली असून, येथील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरवर एका पीडितेने वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करत म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेअंतर्गत (BNS) गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पीडितेवर दिनांक 14 फेब्रुवारी 2025 ते 5 नोव्हेंबर 2025 या कालावधीत वारंवार बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे कृत्य म्हसवड येथील गलंडे हॉस्पिटलच्या पाठीमागील इमारतीत तसेच दोलताडे हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपी डॉक्टरने विश्वासाचा गैरफायदा घेत जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असून, याबाबत कोणालाही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. दीर्घ काळ मानसिक दबावाखाली राहिल्यानंतर अखेर पीडितेने धैर्य एकवटत पोलिसांकडे धाव घेतली.

या प्रकरणी डॉ. बाबासो मारुती दोलताडे, रा. दोलताडे हॉस्पिटल, म्हसवड, ता. माण, जि. सातारा यांच्याविरोधात गुन्हा क्रमांक 429/2025 अन्वये गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी तजवीज ठेवली असल्याचे सांगण्यात आले आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे हे करत असून, म्हसवड पोलिसांकडून सर्व बाबींचा सखोल तपास सुरू आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *