म्हसवड प्रतिनिधी – माणदेश हा जगण्यासाठी धडपडणारां आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अवघा देशाला स्वाभिमानाचे धडे देणारा माणदेश . याच माणदेशातील शाश्वत शेतीसहीत पिण्याच्या पाण्यासाठी आपले आयुष्य खर्ची करणाऱ्या स्व. धोंडीराम वाघमारे यांचा सार्थ अभिमान वाटतो. असे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार म्हणाले. ते वडजल ता . माण येथे स्व. मां आमदार धोंडीराम वाघमारे यांच्या स्मारक अनावरण प्रसंगी बोलत होते.
यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील माजी मंत्री शशिकांत शिंदे, उत्तमराव जानकर, माण खटाव राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, अभय वाघमारे , निर्मला वाघमारे,सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य रणजीतसिंह देशमुख सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई , राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप म्हसवडचे माजी नगराध्यक्ष विलासराव माने , कविता म्हेत्रे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पुढे बोलताना शरदचंद्र पवार म्हणाले की. देशाच्या कानाकोपऱ्यात माणदेशी माणसं भेटतात परिस्थिती वर मात करणारा माणूस म्हणून माणदेशी माणूस ओळखला जातो प्रतिकुल परिस्थिती वर मात करणारा माणूस देशात पहिली सर्कस काढणारा माणूस ही माण तालुक्यातीलच .अशक्य गोष्टी शक्य करणारा माणूस माणदेशी. प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत या भागाचा कायापालट करण्यासाठी पाणी पाहिजे हे ध्येय उराशी बाळगून स्व धोंडीराम वाघमारे यांनी आपले आयुष्य वेचले. राजकारणात सर्व गोष्टी क रता येतात पण आपल्या जिवाभावाच्या माणसासाठी रंजल्या गांजलेल्यांसाठी काम करतो. तोच कित्येक पिढ्या लोकांच्या लक्षात राहतो. असे नेतृत्व म्हणजे स्व. आ. धोंडीराम वाघमारे साहेब. मला मंत्री पद नको माझ्या दुष्काळी भागाला पाणी द्या असे सांगणारा महाराष्ट्राच्या विधानसभेतील एकमेव लोकप्रतीनिधी. म्हणून वाघमारे यांच्याकडे संपूर्ण माणदेश पाहतो. स्व. धोंडिराम वाघमारे यांचा अखंड विचार जपत तुम्ही सर्वांनी मार्गक्रमण करायला हवे. इथून पुढच्या काळात ही पाणी प्रश्नासाठी सगळ्यांनी एकत्रित रहा .तुम्ही निवडून कसे येत नाही ते मी पाहतो…माझे नाते दिल्ली श्वरापशी चालते. सगळ्यांनी एकत्र बसून एक नाव येत्या पंधरा दिवसात ठरवा. सत्ता असो किंवा नसो इथे आपलेच चालते. कामाला लागा स्व. धोंडीराम वाघमारे यांच्या मनातील माण खटाव सत्यात उतरवण्यासाठी तयारीला लागा असे ते म्हणाले.
खा. धैर्यशील मोहिते पाटील यावेळी म्हणाले, ज्यांनी जिहे कटापूर, उरमोडी योजना दिल्या त्या माजी आमदार धोंडिराम वाघमारे यांचे स्मारक निश्चितपणे प्रेरणादायी ठरेल. इथून पुढच्या काळात निश्चित पणाने स्व धोंडीराम वाघमारे यांच्या विचारांचा वारसा अधिक बळकट पने पुढे नेण्याची जबाबदारी माढा चां खासदार म्हणून माझी असेल. माझ्या निवडणुकीत या माण खटाव चे उपकार प्रचंड आहेत. विकासकामांच्या माध्यमातून ते निश्चित पणाने पूर्णत्वास नेऊ. अभय वाघमारे आणि त्यांची आई निर्मला वाघमारे यांना पाठबळ देण्याचं काम करेन..धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले,माण मतदारसंघासाठीच्या पाणी योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न वाघमारे यांनी केला.माणच्या जनतेसाठी झटणारा हा नेता होता.माणची जनता स्वाभिमानी असून पवार साहेबांवर प्रेम करते.त्यामुळे पवार साहेबांचे हात बळकट करा.
उत्तमराव जानकर यावेळी म्हणाले, कार्यकर्त्यावर किती प्रेम करावे हे पवार साहेबांकडून शिकावे अती झाले तर जनता माती केल्या शिवाय राहणार नाही. स्व. धोंडीराम वाघमारे यांच्या विचारांचा वारसा त्यांचे चिरंजीव अभय वाघमारे जपत असल्याचा अभिमान वाटतो.
अभय वाघमारे म्हणाले की माझा माणदेश सुजलाम सुफलाम झाला पाहिजे हे स्वप्न माझ्या वडिलांनी पाहिले होते.गोर गरीबांचा मदतीला धावून जाणारा पण मागच्या राजकारणाच्या पटलावर विस्मृतीत गेलेले नांव त्यांच्या नावाचा विसर पडल्याचे दिसून येत होते हे मोठें दुःख होते म्हणून वडिलांचे येथे भव्य स्मारक केले मृत्यू झाल्यावर टिका टिप्पणी होते ही माण ची संस्कृती नाही.माझ्या वडिलांच्या कार्याला उजाळा मिळावा. म्हणून वसंत रुतत शरद भेटायला आला आहे. पवार साहेब राजकारणातील आॅक्सिजन श्वास आहेत.
यावेळी निर्मला वाघमारे यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे डॉ शिवाजी गावडे , प्रभाकर देशमुख,अनिल देसाई रणजीत देशमुख अभय जगताप,यांनीही मनोगत व्यक्त केले.