म्हसवड दि.प्रतिनिधी माण तालुक्याचे सुपुत्र तसेच तत्कालीन माण-फलटण विधानसभा मतदारसंघाचे स्व. आमदार धोंडीराम वाघमारे यांच्या स्मारकाच्या उद्घाटनास उपस्थित राहणार असल्याची ग्वाही माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरदचंद्रजी पवार यांनी दिली असल्याची माहिती अभय धोंडीराम वाघमारे यांनी दिली
आज सकाळी पुणे येथे माजी कृषिमंत्री खा.शरदचंद्र पवार यांची भेट घेतली या वेळी फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब खटके, अभय धोंडीराम वाघमारे,अभय जगताप शिवाजी डोंबाळे, साहेबराव खरात आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अभय धोंडीराम वाघमारे यांनी माण तालुक्याचे सुपुत्र तत्कालीन माण फलटण विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार स्वर्गीय धोंडीराम वाघमारे यांचे स्मारक वडजल या त्यांच्या जन्मगावी उभारण्यात आले असून या स्मारकाच्या उद्घाटन माजी कृषिमंत्री खासदार शरद चंद्रजी पवार यांचे हस्ते व्हावे अशी मान व फलटण तालुक्यातील स्वर्गीय धोंडीराम वाघमारे यांना मानणारे असंख्य कार्यकर्त्यांची इच्छा असल्याने या स्मारकाचे उदघाटन आपल्या हस्ते व्हावी अशी मागणी खा.शरदचंद्र पवार यांच्याकडे केली.
यावेळी माजी कृषिमंत्री खा. शरदचंद्रजी पवार म्हणाले दुष्काळी माण तालुक्यांमध्ये 1990 मध्ये धोंडीराम वाघमारे हे अपक्ष म्हणून निवडून आले होते त्यानंतर 1995 मध्येही त्यांनी अपक्ष म्हणून पुन्हा विधानसभेत दुष्काळी माण तालुक्याचे नेतृत्व केले या काळामध्ये त्यांनी माण तालुक्याला वरदान ठरणाऱ्या उरमोडी जिहे-कटापूर योजना मंजूर करण्यात यश मिळवले होते. सुशिक्षित व लेखक व कवी मनाचा व दुष्काळी भागाची जाण असलेलं बुध्दीजिवी लोकप्रतिनिधी लाभले होते त्यांच्या स्मारकाच्या उद्घाटनासाठी आपण लवकरच येणार असल्याचे खा. पवार यांनी यावेळी सांगितले. फलटण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब खटके यांनी धोंडीराम वाघमारे यांनी दुष्काळी माण तालुक्यावर ती लिहिलेला हुंदका कवीतासंग्रह खा.शरदचंद्रजी पवार यांना भेट दिला.
या भेटीमध्ये खा.पवार म्हणाले धोंडीराम वाघमारे यांचा माण फलटण, खटाव,खंडाळा आदी भागात प्रभाव होता असे सांगून अभय वाघमारे व कुटुंबीयांची आस्थेवाईकपणे चौकशी करून माण तालुक्यासह विविध विषयांवर सखोल चर्चा झाल्याची माहिती ही अभय वाघमारे यांनी दिली