खडीक्रशर कारवाईचे नावाखाली सील, पुन्हा चालू ही महसूलचीच जनतेच्या डोळ्यांत धूळफेक आहे – संजय भोसले महसूल आणी खाण माफीयांचे आर्थिक लागेबंद यास जबाबदार
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
देशभरात कायद्याचे तीन तेरा वाजतानाच माण तालुक्यातील महसूलचे चारा छावण्यातील भगदाड कोर्टात जाऊन उघडे पाडावे लागले असतानाच आता खाण माफीयांचे आणी महसूल अधिकार्यांचे लागेसंबंध पैसा आणी सत्ता यातून जनतेच्या तक्रारी आल्या की छातूरमातूर कारवाया करत सील बंदचे नाटक करणारे महसूल विभाग कलम 188 बेलेबल ईतपर्यंतच सिमीत का राहते याची उत्तरे त्यांनीच द्यावीत कारण गावगड्यांपासून जमिनीच्या इंच न इंच क्षेत्राची माहीती ठेवणारे कोतवाल,तलाठी, मंडलअधिकारी, ते तहसिलदार आणी सोबतीला पोलीस लवाजमा असताना ५ मार्च २०२२ रोजी सील केलेले क्रशर आजमितीपर्यंत चालू राहतातच कशे असा प्रश्न ठाकरे गटाचे सातारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी करतानाच यामध्ये अधिकार्यांची मिलिभगत असलेखेरीज असे प्रकार घडूच शकत नसलेचे जाहीर म्हटले आहे.
सिल क्रशर एका दिवसापुरते देखील सिल नसावेत असा संशय व्यक्त करतानाच स्वत:ची कातडी वाचविण्यासाठी नाममात्र कारवाया करुन शासनाचा महसूल बुडवत क्रशर मालकांचे आणी अधिकार्यांचे उकळ भरण्याचा हा मोठा डाव असल्याचे भोसले यांनी म्हणतानाच. कोट्यावधीचे उत्खनन व चोरी लपवण्यासाठीच असे प्रकार घडविले जातात ,जर का असे काही नाही तर मग तालुक्यात खपवलेली खडी,डस्ट,बांधकामासाठी वापरलेली कच ही कुठून आली याचा महसूल कोणी बुडविला ज्यांचे क्रशर चालू होते त्याची ईतंभूत माहीती काढून त्यांचेवरती कलम 379 प्रमाने महसूलने आजमितीपर्यंत गुन्हे का दाखल केले नाहीत हा जनसामान्यांचा प्रश्न असलेचे भोसले यांनी सांगतानाच लवकरच याही बाबत न्यायालय , लोकपाल, यांचेकडे तक्रारी दाखल करणार असलेचे भोसले यांनी सांगितले आहे.