कराड तालुक्यातील शाळा महाविद्यालयात कृष्णा नदी बचाव चळवळ नैसर्गिक कलर व नैसर्गिक स्रोत वाचवण्यासाठी व पाणी बचत करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मध्ये करते प्रबोधन

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते
कराड:प्रतिनिधी

      सध्या रंगपंचमी निमित्त होणाऱ्या नदी प्रदूषणा बाबत कृष्णा बचाव चळवळीच्या माध्यमातून शाळा कॉलेज महाविद्यालयामध्ये नैसर्गिक स्त्रोत वाचवण्यासाठी प्रबोधन केले जात आहे ….
      सध्या सातारा जिल्ह्यामध्ये पाणीटंचाई जाणवत आहे काही ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे प्रशासन आपल्या परीने प्रयत्न करीत आहे या पार्श्वभूमीवर आपली सामाजिक जबाबदारी म्हणून पर्यावरण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारी गोव्याची सामाजिक संस्था विवेकानंद पर्यावरण फौज गोवा यांच्या सहकार्याने पर्यावरण अभ्यासक नदी बचाव चवळीचे सक्रिय कार्यकर्ते राजेंद्र केरकर गोवा यांच्या मार्गदर्शनाखाली नदी बचाव साठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते राहुल पवार व त्यांची टीम यांनी कराड तालुक्यातील सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांना नैसर्गिक कलर निर्मिती व नदी प्रदूषणाबाबत प्रबोधन केले आहे

       गोव्याच्या विवेकानंद फौज सदस्य सूर्यकांत गावकर यांनी बनवलेले नैसर्गिक कलर यांची कार्यशाळा कराड तालुक्यातील शाळांमध्ये घेतली गेली या मोहिमेत न्यू इंग्लिश स्कूल करवडी कल्याणी इंग्लिश मीडियम स्कूल ओगलेवाडी शिवाजी विद्यालय मसूर विठामाथा विद्यालय कराड आनंदराव चव्हाण विद्यालय मलकापूर प्रमिलाताई चव्हाण कन्या शाळा मलकापूर आदर्श विद्या मंदिर मलकापूर आदर्श विद्यामंदिर विंग.रामविलास लाहोटी कन्या शाळा कराड ज्योतिर्लिंग विद्यालय कवठे श्री संत तुकाराम विद्यालय कराड या शाळेनी प्रचंड प्रतिसाद दिला

     या मोहिमेसाठी कृष्णा नदी बचाव चे राहुल पवार विजय जगताप अशोक सुतार आबासाहेब चव्हाण प्राजक्ता जगताप विजया माने माधवी पवार रामनाथ परब सूर्यकांत गावकर व शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला गेला आहे

       या कृष्णा नदी बचाव चळवळीच्या या नैसर्गिक स्त्रोत वाचवण्याच्या उपक्रमाचे समाजातील विविध स्तरातील मान्यवरांकडून कौतुक होत आहे पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर गिरीश राऊत प्रणाली राऊत निर्मला सावंत गोवा राज्याचे सभापती रमेश तवरकर कराडचे युवा नेते सौरभ पाटील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कृष्णा बचाव चळवळीच्या या उपक्रमाचे कौतुक केले 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!