अनुसुचित जातीतील मुलीचा विनयभंग करुन अत्याचार केल्या प्रकणी जांभूळणी ता.माण येथील विक्रम मारुती काळेल याचेविरुद्ध म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
तू आवडतेस, तू माझ्याशी बोल,माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे, मी तुझ्यासोबत लग्न करेन अशी बतावणी करुन वारंवार विनयभंग व याबरोबरच अत्याचार करुन नंतर कोणास सांगितले तर तुझी मी बदनामी करेन अशी धमकी देऊन अनसुचित जातीतील मुलीस जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी विक्रम मारुती काळेल रा जांभुळणी (ता.माण ) याचे विरुद्ध म्हसवड पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, नोव्हेंबर 2023 नक्की तारीख माहीत नाही रात्री आठ वाजनेच्या सुमारास त्यानंतर दिनांक 31 मार्च 2024 रोजी रात्री अकरा वाजनेच्या दरम्यान जांभुळणी (ता.माण ) गावचे हद्दीत आरोपी विक्रम काळेल याने त्याच्या दुकानात याबरेबरच गावाबाहेर माळरानात पीडित मुलीला मोटार सायकल वरून पाठलाग करून मोबाईलवर त्याचे मोबाईल वरून वारंवार फोन करून तू आवडतेस तू माझ्याशी बोल माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे मी तुझ्यासोबत लग्न करेन असे म्हणून त्याचे दुकानावर बोलावून घेऊन जबरदस्तीने दुकानातच अत्याचार केला.कोणास सांगितले तर वारंवार बदनामी करुन तसेच जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देऊन त्याने त्याचे कडील असलेल्या पिकअप या चारचाकी वहानात मध्ये बसवून गावातून बाहेर माळरानात आड बाजूस नेहून वारंवार तिचेवर जबरदस्तीने इच्छे विरुद्ध शारीरिक संबंध ठेवले त्यामुळे तिला दिवस गेले.
त्यानंतर तिला गोळ्या आणून खाण्यासाठी दिल्या तिच्या पोटात दुखून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला तसेच सदरचा प्रकार कोणाला सांगितलेस ठार मारण्याची धमकीही दिल्यामुळे अत्याचार पीडित मुलीने म्हसवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.पीडित मुलीच्या फिर्यादीवरून म्हसवड पोलीस ठाण्याचे सपोनि बिराजदार यांनी त्वरित संशयित आरोपी विक्रम काळेल अटक करून आरोपीवर गुन्हा दाखल करणेत आला असुन सदर गुन्ह्याचा तपास दहिवडी कार्यालयाचे उपविभागीय पोलीस अधिकारी करीत आहेत.