शिक्षणाची खरी देवी ही सावित्रीबाई फुलेच :प्रा.वसंतराव यादव.

बातमी Share करा:

म्हसवड : प्रतिनिधी

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ व रमाबाई आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचा कार्यक्रम म्हसवड मध्ये संपन्न झाला. माणदेश शिक्षण विकास संस्था म्हसवड त्रिशक्ती महिला सोशल फाउंडेशन म्हसवड व प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसवड यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ व रमाबाई आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त भव्य महिलांसाठी आणि किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून छायाताई नानगुडे मोमेंट टीव्ही संपादक भुमाता महिला मंडळ पुणे जिल्हा बापूसाहेब झुंबर लाड मराठा सेवा संघ पुणे जिल्हा अध्यक्ष तसेच पत्रकार प्रकाश फडके तसेच रंजनाताई कांबळे भीमाश सेना पुणे जिल्हा तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉक्टर लक्ष्मणराव कोडोलकर वैद्यकीय अधिकारी मान तालुका तसेच धनश्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुण्याचे संजयजी रणदिवे सर त्याचबरोबर सरस्वती विद्यालय म्हसवडच्या सचिव उमाताई शेटे त्याच त्याचबरोबर शिव दिन शिवधन इन्स्टिट्यूट एग्री डिप्लोमा यांच्या सचिव रूपालीताई लोखंडे तसेच युवा क्रांती दलाचे राज्य कार्यवाहक राजकुमार डोंबे व अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन नितीन भाई जोशी व नगरसेविका शोभाताई लोखंडे यांना या ठिकाणी महाराष्ट्र समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमासाठी पुण्याहून सामाजिक कार्यकर्त्या सीमाताई विरकर प्रमुख उपस्थितीत होत्या त्याचबरोबर सिने अभिनेत्री प्रियंका कांबळे पुणे या विशेष उपस्थिती मधून होत्या या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते वसंतराव यादव हे होते या आरोग्य शिबिरासाठी जवळजवळ शंभर ते दीडशे लोक उपस्थित होते 70 ते 80 लोकांनी आरोग्य तपासणी करून घेतली या कार्यक्रमाचे आयोजन स्त्रीशक्ती महिला फाउंडेशनच्या संस्थापिका साधनाताई लोखंडे मानदेश शिक्षण विकास संस्थेचे संस्थापक धर्मराज लोखंडे उपाध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र माने व सचिव पत्रकार नितीन तुपे यांनी विशेष परिश्रम घेतले पत्रकार नितीन तुपे यांना मोमेंट टीव्हीचे सातारा जिल्हा प्रतिनिधी म्हणून नेमणूक करण्यात आली या कार्यक्रमासाठी म्हसवड परिसरातील सर्व लोकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धर्मराज लोखंडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले सर


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!