मेरी माता हायस्कूल आणि ज्यू कॉलेज,म्हसवड चा विद्यार्थी आणि माण तालुक्यातील पांगरी गावचा होतकरू भारतातील पहिला व्यावसायिक तसेच आंतरराष्ट्रीय बेसबॉल खेळाडू *चि.सौरभ गायकवाड* याला सातारा जिल्ह्याचा 2023-24 या वर्षातील सर्वोत्कृष्ट गुणवंत जिल्हा क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. *
साताऱ्याचे नूतन जिल्हा क्रीडाअधिकारी मा.श्री नितीन तारळकर* यांनी ग्रामीण भागातील एक होतकरू आणि या पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट योग्यता असणारा खेळाडू सौरभ गायकवाड याची मागील ९ वर्षांमध्ये बेसबॉल खेळामध्ये अविस्मरणीय कामगिरी लक्षात घेऊन त्याची दिनांक २६ जानेवारी रोजी जिल्हा क्रीडाअधिकारी कार्यालय,सातारा या ठिकाणी देण्यात येणाऱ्या सर्वोत्कृष्ट क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस करून समितीच्या असल्याने पुरस्कार घोषित केला.
हा पुरस्कार शाहू स्टेडियम सातारा या ठिकाणी *सातारा जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री मा.श्री शंभूराजे देसाई* यांच्या हस्ते खेळाडूंना देण्यात येणार असून आज पर्यंतच्या या ग्रामीण भागातील खेळाडूच्या अपार कष्टांना या पुरस्काराच्या माध्यमातून आणि मा.श्री जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर साहेबांच्या निरीक्षणातून *श्री.शंभुराजे देसाई साहेबांच्या माध्यमातून पाठीवर मिळालेली शाब्बासकीची थापच!* असणार आहे. सौरभने त्याच्या छोट्याशाच पण स्वर्णिम कारकिर्दीमध्ये बेसबॉल या क्रीडा प्रकारात मेरी माता हायस्कूल,म्हसवड येथे शालेय शिक्षण घेत असताना फादर वर्गीस ,फादर जॉंमी, क्रीडा शिक्षक विष्णू काळेल, संतोष खासबागे* यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास १५ हून अधिक शालेय,असोसिएशन तसेच इतरही राष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवले आहे त्याच्या या कामगिरीबद्दल त्याला मिळालेला हा पुरस्कार *आज माण वासियांच्या शिरपेच्यात आणखी एक मानाचा तुरा आहे चि.सौरभ गायकवाड याने मिळवलेल्या यशाबद्दल फादर सनू ,फादर रॉंबिन व सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या
* सातारा जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री मा.श्री शंभूराजे देसाई* यांच्या हस्ते खेळाडूंना देण्यात येणार आहे