“एकनाथ हिरक आरोग्य वर्ष” अंतर्गत उंब्रज येथे शनिवारी महाआरोग्य शिबिर

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला 
श्रीकांत जाधव
उंब्रज, दि. १० (प्रतिनिधी) :
            उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या एकसष्ठी निमित्त साजऱ्या होत असलेल्या “एकनाथ हिरक आरोग्य वर्ष” उपक्रमांतर्गत उंब्रज येथे मोफत महाआरोग्य तपासणी, औषधोपचार व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार, दि. १४ मार्च रोजी सकाळी १० वाजता सौभाग्य मंगल कार्यालय, कॉलेज रोड, उंब्रज (ता. कराड) येथे होणार आहे.

        या महाआरोग्य शिबिराचे नियोजन श्री शिवयोद्धा प्रतिष्ठान यांनी केले असून सह्याद्री (मनीपाल) हॉस्पिटल कराड, गांधी फाउंडेशन, विघ्नहर्ता क्लिनिक, मोरया डेंटल क्लिनिक आणि यश लॅबोरेटरी यांच्या सहकार्याने शिबिर पार पडणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष बेडके यांनी दिली.

        या कार्यक्रमाला पर्यटन व खनिजकर्म मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई तसेच उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष धीरज गांधी आणि श्री स्वामी समर्थ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अविनाश काशीद आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

           या शिबिरामध्ये नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार, मोफत चष्मा वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, कान-नाक-घसा तपासणी, दंत चिकित्सा, हृदयविकार तपासणीसाठी मोफत ईसीजी, 2D इको व अँजिओग्राफी तपासणी तसेच त्यानंतर आवश्यक शस्त्रक्रिया, तसेच वंध्यत्व व व्हेरीकोज व्हेन निदान-उपचार यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

       यासोबतच रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले असून प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.

        सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री शिवयोद्धा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष शरद जाधव व खजिनदार रणजित कदम यांनी केले आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *