सातारा जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे अध्यक्ष इंजि. कृष्णात फडतरे यांची माजी राज्य कार्याध्यक्ष इंजि. सुनील पोरे यांना सदिच्छा भेट
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड (ता. माण) –
सातारा जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे अध्यक्ष इंजिनिअर कृष्णात फडतरे यांनी पदाधिकाऱ्यांसह माजी राज्य कार्याध्यक्ष इंजि. सुनील पोरे यांचे म्हसवड येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटी दरम्यान संघटनेच्या विविध प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा झाली.
या प्रसंगी ग्रामविकास मंत्री मा. ना. जयकुमार गोरे यांच्याकडून अभियंता संघटनेच्या न्याय्य मागण्या मार्गी लावण्यासाठी सहकार्य आणि पाठबळ मिळावे, अशी अपेक्षा इंजि. फडतरे यांनी व्यक्त केली. संघटनेच्या हितासाठी सर्वांना एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
या भेटीमध्ये संघटनेचे अन्य पदाधिकारी इंजि महेश तिकोले विक्रांत शिंदे बाबासो कुंभार आणि सदस्यही उपस्थित होते. ही सदिच्छा भेट स्नेह आणि सहकार्याचे प्रतीक ठरली असून, संघटनेच्या आगामी वाटचालीसाठी ही एक सकारात्मक पाऊल ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.