सातारा पोलिसांची कामगिरी वाढे फाटा येथे बेछूट गोळीबार करुन खून केल्याचा गुन्हा उघड
व्हिजन २४ तास न्यूज
Ahmad Mulla
BY; Sadik Shekh
गोंदवलेखुर्द ;
स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची अफलातून कारवाई)
गुन्हेगार कितीही शातील असला, तसेच त्याने कितीही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला तरी पण पोलिसांच्या नजरेतून सुटू शकत नाही याची अफलातून प्रचिती दिली स्थानिक गून्हे शाखा सातारा पोलिसांनी वाढे फाटा येथे बेछूट गोळीबार करुन खून केल्याचा गुन्हा उघड केला सातारा स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी.
सविस्तर असे
दिनांक ०४/०२/२०२३
दि.२४/०१/२०२३ रोजी रात्रौ ००.३० वा. चे. सुमारास वाढे गावचे हद्दीत पुणे कोल्हापूर रोडवर सर्व्हिस रोड लगत मयत अमित आबासाहेब भोसले रा. शुक्रवारपेठ सातारा यांचेवर अज्ञात इसमांनी मोपेडे मोटार सायकलवरयेवून गोळीबार करुन त्यांचा खुन केला. त्याबाबत फिर्यादी यांनी दिले फिर्यादीवरुन सातारा तालूका पोलीस ठाणे
गु.र.नं. ३२/२०२३ भादविक ३०२, ५०६ (२), ३४ सह भारतीय हत्यार अधिनियम कलम ३, २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) (३), १३५ गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
नमुद गुन्हयाचे गांभीर्य लक्षात लक्षात घेवून श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा व श्री. मोहन शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा यांनी गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवून सदरच्या गुन्हयातील अज्ञात आरोपी निष्पन्न करुन गुन्हा उघडकीस आणण्याच्या
सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा व पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके सातारा
तालूका पोलीस ठाणे यांना दिल्या. पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी त्यांचे अधिपत्याखाली सहायक पोलीस
निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील व स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार यांचे व
व पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके सातारा तालूका पोलीस ठाणे यांनी सातारा तालूका पोलीस ठाणेकडील तपास पथक तयार केले. स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकाने घटनास्थळावर चौकशी केली तसेच तांत्रिक पुराव्यांचा शोध
घेवून मयताच्या कुटूंबाकडे व इतर साक्षिदार यांचेकडे चौकशी केली असता ६ आरोपी निष्पन्न केले त्यामधील १ विधी संघर्षग्रस्त बालक यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.
नमुद आरोपींचे ठावठिकाण्याबाबत माहिती प्राप्त केली असता ते गुन्हा घडलेपासुन फरार होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हा घडलेपासुन त्यांचा सातारा, पुणे, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, लातुर,
अलिबाग, इंदौर, उज्जैन- राज्य मध्यप्रदेश अशा वेगवेगळ्या जिल्हयात तसेच गोवा राज्यात शोध घेतला. सपोनि
रमेश गर्जे व पोउनि अमित पाटील यांची दोन स्वतंत्र पथके त्यांच्या मागावरच होते. दरम्यान त्यांचे वास्तव्य असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी बातमीदार तयार करुन त्यांना पकडण्यासाठी कौशल्यपुर्ण प्रयत्न केले. दरम्यान
दिनांक ३ फेब्रुवारी २०२३ रोजी गोपनीय बातमीदारामार्फत नमुद आरोपी हे गोवा येथे असल्याचे खात्रीलायक बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली. नमुद आरोपी हे सराईत असल्याने व ते त्यांचे लोकेशन सातत्याने चेंज करीत असल्याने व स.पो.नि. रमेश गर्जे व तपास पथक गोवा येथे पोहोचण्यास
दोन तीन तासाचा अवधी होत असल्याने तातडीने हलचाल करण्यासाठी श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा
यांनी सदरची माहिती श्री. निधीन वाल्सन, पोलीस अधीक्षक उत्तर गोवा यांच्या मदतीने ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयात आणुन त्यांचेकडे
विचारपुस केली असता त्यांनी मयताच्या पत्नीकडुन सुपारी घेवुन सदरचा खून केल्याचे सांगीतले. त्यानंतर मयताची पत्नी तसेच १ विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेवुन मयताच्या पत्नीकडे विचारपुस केली असता तीने तीचा मयत पती हा बाहेरील स्त्रीयांशी अनैतिक संबंध ठेवुन तीला मारहान करीत होता म्हणुन तीनेच त्याच्या खुनाची सुपारी दिली असल्याचे सांगीतले आहे.
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा, श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा व श्री. मोहन शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर,उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, संतोष पवार, अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय
शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, निलेश काटकर, गणेश कापरे, मोहन पवार, मयुर देशमुख, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन
ससाणे, सायबर विभागाचे अजय जाधव, अमित झेंडे, अनिकेत जाधव, सुशांत कदम व सातारा तालूका पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, पोलीस अंमलदार राजेंद्र वंजारी, दादा परिहार, नितीराज थोरात, सतिश पवार, सचिन पिसाळ, रायसिंग घोरपडे, राहूल राऊत यांनी सदरची कारवाई केलेली आहे. गुन्हयाचे घटनास्थळी कोणताही पुरावा नसताना गोपनीय बातमीदार, CCTV फुटेज तसेच तांत्रीक
विश्लेषनाचे आधारे आरोपींची माहिती काढुन सलग १० दिवस आरोपींचा पाठलाग करुन त्यांना जेरबंद करण्याची कौशल्यपुर्ण कामगिरी करणा-या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक
सातारा तसेच अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.