जिल्हाध्यक्ष इंजि सुनील पोरे व त्यांच्या सहकारी टीमच्या अथक प्रयत्नामुळेच सातारा जिल्ह्यातील शिंपी समाज एकसंघ :राज्याध्यक्ष संजय नेवासकर

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड(संपादक:अहमद मुल्ला )
मल्हारपेठ
सातारा जिल्ह्यातील शिंपी समाज एकसंघ नामदेव समाजोन्नती परिषदेचे छत्राखाली असलेचे पाहून समाधानी याचं श्रेय जिल्हाध्यक्ष इंजि सुनील पोरे व त्यांच्या सहकारी टीमचेच असल्याचे प्रतिपादन राज्याध्यक्ष संजय नेवासकर यांनी केले
      नामदेव समाजोन्नती परिषदेच्या वतीने पाटण येथील स्वामी मंदिरामध्ये पाटण तालुक्यातील शिंपी समाज बांधवांची बैठक आयोजित केली होती याप्रसंगी ते बोलत होते यावेळी संजय नेवासकर राज्य अध्यक्ष ,राजेंद्र पोरे मुख्य विश्वस्त ,डाॅ अजयजी फुटाणे सरचिटणीस ,वसंतराव खुर्द विश्वस्त, दिलीप काका लंगडे  विश्वस्त ,रोहित यवतकर सह चिटणीस ,दिगंबर क्षिरसागर ,विजय चांडवले ,नासप सातारा जिल्हाध्यक्ष
इंजि . सुनिल पोरे, पाटण तालुका अध्यक्ष योगेश हिरवे ,उपाध्यक्ष श्रीकांत फुटाणे सचिव विजय बारटक्के आदि मान्यवर उपस्थित होते
   यावेळी नेवासकर म्हणाले की ,भविष्यात आपल्या समाजाने संघटित  असणं काळाची गरज आहे महाराष्ट्र मध्ये संपूर्ण शिंपी समाज एकत्रित येणे गरजेचे आहे एकत्र आल्यानंतर जी ताकद उभी राहणार आहे त्यातून आपल्या समाजाच्या अडीअडचणी सुटणार आहेत आज पंढरपूर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे संत नामदेव महाराजांची स्मारक उभे राहत आहे जवळपास ७० ते ८० कोटी यासाठी खर्च येणार आहे यासाठी महाराष्ट्र सरकारने पन्नास कोटी रुपये दिले आहेत जागेचा विषयी लवकर मार्गी लागून येणाऱ्या पाच ते सहा महिन्यात तेथे भूमिपूजन घेणार आहोत . महाराष्ट्रात आपण सातारा जिल्ह्याप्रमाणे सर्वजण संघटित होऊन आपली एकी दाखवणे गरजेचे आहे .नासप च्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर समाज एकत्रित आणण्याचे काम करत असून तोसध्या एका छत्र छायेखाली काम करत आहे पण काही संघटना कागदोपत्री पदे  वाटत असून नेमकं त्यांचं काय काम आहे हे समाजाने विचारलं पाहिजे असेही ते म्हणाले
  यावेळी अजय फुटाणे म्हणाले की , ह्या चार-पाच वर्षात समाजाचे संघटन असणे गरजेचे आहे
पुढील काही दिवसांमध्ये आपल्याला समाजाचे जात निहाय जनगणना करणे गरजेचे आहे .कारण आता ओबीसीचा प्रॉब्लेम येणार आहे या अगोदरही 2011/12 साली सुप्रीम कोर्टाने शिंपी समाजाच आरक्षण रद्द केले होते त्यानंतर राज्य मागासआयोगाकडे  नासपने अनेक वेळेला भेटी घेऊन पत्रव्यवहार केले त्यानंतर २०१४ ला पून्हा शिंपी समाजासाठी ते आरक्षण मिळवलं त्यासाठी संघटना मजबूत असणे काळाची गरज आहे . इंजि . सुनील पोरे यांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यामधून एक नवीन पिढी समोर येत आहे .
   सुनील पोरे म्हणाले की, पाटण तालुक्यात नासप च्या माध्यमातून संपूर्ण समाज आज आपणाला एकत्र संघटित झालेला दिसत आहे .आज आपला समाज अल्पसंख्यांक असून उदरनिर्वाह करून आपले पोट भरत आहे त्या समाजाबरोबर निष्ठेने राहणे आणि त्यांचे काम करणे त्याच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे . नासप संघटना १९०७ साली स्थापन झालेली आहे .आपली ताकद एकसंघ असेलतर प्रस्थापितांना आपला विचार करावा लागणारच आहे येणाऱ्या काळामध्ये साताऱ्यामध्ये राज्यस्तरीय मेळावा घेण्याचे आयोजन असून माझ्या समाजाच्या इच्छुक बांधवांस घुमान या ठिकाणी माफक खर्चात घेऊन जायचं आहे नासपचे मुखपत्र नामदेव हितवर्धक मासिक आहे त्याचे पण सभासद व्हावे आपल्या समाजाच्या सर्व माहिती यामध्ये उपलब्ध आहे .
याप्रसंगी नामदेव समजोन्नती पदाधिकाऱ्यांचा सत्कार पाटण शिंपी समाजाच्या वतीने करण्यात आला यावेळी पाटण शिंपी समाजाचे अध्यक्ष नरेंद्र खांडके , विजय विंचु ,राजेंद्र मुळे दीपक खांडके अनिल बोधे संजिव टोपले अशोक हिरवे प्रकाश खटावकर नामदेव वनारसे संजय टोपले आदि समाज बांधव उपस्थित होता .
यावेळी तालुक्यातील शिंपी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!